राईनपाडा घटनेच्या निषेधार्थ भुसावळात उद्या इन्साफ मोर्चा

0

जगन सोनवणे यांची माहिती ः दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

भुसावळ- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुले पळवण्याच्या संशयातून नाथपंथी उवरी गोसावी व नाथजोगी समाजाच्या पाच निष्पाव जीवांशी क्रुरपणे हत्या केल्याचा पीपल्स रीपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष जगन सोनवणे यांनी निषेध केला असून घटनेतील दोषींना फाशी शिक्षा देण्यासह अन्य मागण्यांसाठी शनिवार, 7 रोजी सकाळी 11 वाजता डी.एस.ग्राऊंडपासून प्रांताधिकारी कार्यालयावर ईन्साफ मोर्चा काढण्याचा निर्धार त्यांनी शुक्रवारी सायंकाळी आयोजित पत्रकार परीषदेत व्यक्त केला.

घटनेची सीबीआय चौकशी करा
राईनपाडा घटनेची सीबीआय चौकशी करून दोषींना फाशीची शिक्षा द्या, मयतांच्या कुटुंबियांतील एका वारसाला शासकीय नोकरी द्यावी तसेच अत्याचार पीडीत कुटुंबाला भरपाई द्यावी, फास्ट ट्रॅक न्यायालयात हा खटला चालवावा आदी मागण्या सोनवणे यांनी केल्या आहेत. दरम्यान, शुक्रवारी त्यांनी साकेगाव येथे धिक्कार सभा घेवून मार्गदर्शनही केले. प्रसंगी राकेश बग्गन, हरीष सुरवाडे, राजेश शितोळे, विश्‍वनाथ साळुंखे, नागो साळुंखे, दिनेश शिंदे, शंकर शिंदे, भरत चव्हाण, प्रकाश चव्हाण, कैलास तांबे, जगन साळुंखे, सदू बाबर, धर्मा चव्हाण, रमेश साळुंखे, कैलास साळुंखे, एकनाथ बावर, संगीता ब्राह्मणे आदींची उपस्थिती होती.