धुळे : साक्री तालुक्यातील राईनपाडा गावातील सामूहिक हत्याकांडा प्रकरणी आणखी आणखी एक मुख्य आरोपीला युवराज गणु चवरे (रा.देवळीपाडा) यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. या हत्याकांडात महारु वनक्या पवार, हिरालाल गवळीव दशरथ काडग्या पिंपळसे (35) या तीन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे.
गावात स्मशान शांतता
साक्री तालुक्यातील राईनपाडा या आदिवासी बहुल भागात घडलेल्या सामूहिक हत्येनंतर उमटलेले तीव्र पडसाद आणि त्यामुळे लावण्यात आलेला पोलिसांचा बंदोबस्तामुळे गावात स्मशानशांतता पसरली आहे़ आठ दिवस होऊनही परिस्थिती सारखीच आहे़ वेगवेगळ्या अफवा पसरविल्या गेल्याने आणि त्या व्हायरल होत असल्याने हे पाचही निरपराध बळी ठरले़ किरकोळ वाद होणार्या गावात इतकी मोठी घटना घडल्याने त्याचे पडसाद आजूबाजूच्या पाड्यांमध्ये उमटण्यास सुरुवात झाली आहे़ राईनपाड्यासारख्या गावात कधी नव्हे इतकी मोठ्या प्रमाणात हत्याकांड झाल्याची खळबळजनक घटना घडली़ गावातील बहुसंख्य पुरुष मंडळी अगदी गाव सोडून पसार झाल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे़