प्रशासनाला निवेदन : पाच कुटुंबाचे पुर्नवसन करण्याची मागणी
मुक्ताईनगर- धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील सामूहिक हत्याकांडाचा 4 जुलै बुधवारी मुक्ताईनगर येथील नाथजोगी समाजाने निषेध केला. गैरसमजुतीतुन उद्ध्वस्त झालेल्या पाच कुटुंबांचे संपुर्ण पुनर्वसन शासनाने करावे व दोषींना कठोर शिक्षा व्हावी याविषयीचे निवेदन तहसीलदार मनोज देशमुख यांना देण्यात आले. पोटाची खळगी भरण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील नाथपंथीय काही कुटुंब राईनपाडा परीसरात आले होते मात्र मुले पळवुन नेणारी टोळी आल्याच्या अफवेतून राईनपाड्यातील राक्षसी प्रवृत्तीने गेल्या रविवारी भिक्षुकी करून पोट भरणार्या पाच जणांची निर्घृण हत्या केली .माणुसकीला काळीमा फासणारी ही घटना असून दोषी नराधमांना फाशीची शिक्षा व्हावी, काही-एक चूक नसतांना दारोदारी भिक्षा मागुन पोट भरणार्यांच्या मयतांच्या कुटुंबियांचे कायमस्वरूपी पुनर्वसन शासनाने करावे, अशी मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देतेवेळी अखिल भारतीय नाथजोगी समाज मंडळाचे जिल्हा संघटक संदीप जोगी, अध्यक्ष मोतीलाल जोगी, वसंतनाथ जोगी, रमेशनाथ जोगी, विठ्ठलनाथ जोगी, राजमेश जोगी, किशोर जोगी, रामचंद्र जोगी, संतोष जोगी, दीपक जोगी, राकेश जोगी, चेतन जोगी, कैलास वंजारी, कैलास काळे आदी समाजबांधव उपस्थित होते.