मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उदयराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत का? याचा पुरावा द्यावा असे वक्तव्य केले होते. या वक्तव्याने राज्यभरात राऊतांविरोधात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान आज शुक्रवारी 17 रोजी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्याकडून सांगली जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे.
आजच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शहारात आज सकाळपासून दुकाने बंद आहेत. तसेच, सांगली बंद आणि मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सांगलीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी उदयनराजे भोसले यांनी आपण छत्रपतींचे वासर असल्याचे पुरावे द्यावेत, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले होते. यावरून सध्या राज्यात वादाला तोंड फुटले आहे. संजय राऊतांनी उदयनराजे यांच्याबद्दल वक्तव्य करुन देशाचा अपमान केला. हा अपमान छत्रपती परंपरेचा अपमान आहे, असे आम्ही मानतो. याचा निषेध म्हणून 17 जानेवारीला सांगली बंद राहील, असे संभाजी भिडे यांनी सांगितले आहे.