राकाँ महिला उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्षपदी कल्पना पाटील

जळगाव – राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष रूपाली चाकणकर यांच्या हस्ते कल्पना पाटील यांची राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या उत्तर महाराष्ट्र विभागीय उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली. याबाबतचे नियुक्ती पत्र त्यांना खा. सुप्रिया सुळे यांच्या हस्ते देण्यात आले.