म्हसदी । साक्री येथील रहिवाशी व चोपाडा येथील वनपाल राकेश खैरनार यांनी वनखात्यांत उत्कृष्ट कार्य केल्यामुळे त्यांचा राज्यपाल विद्यासागर व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रजत पदक देवून मुंबई येथे गौरविण्यात आले. खैरनार यांनी वनपाल म्हणून नोकरी करीत असतांना 13 अवैध गुन्ह्यांत 2 लाख दहाहजार रूपयांचा सागवानी लाकूड पकडून जमा जप्त केला. 33 अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण नष्ट केले. विविध गुन्ह्यातील आरोपींना पकडून न्यायप्रविष्ठ कले . 9 गुन्ह्यांत 1 लाख 47 हजारांचा माल पकडून जमा केला. यासोबतच सागवान लाकूड तस्करीत 2 मोटरसायकल व एक सायकल जप्त केली. यापुरस्कर प्रदानप्रसंगी वनमंत्री सुधीर मुनगटीवार, राज्यमंत्री दिपक केसकर, सुमित माणिक, विकास खर्गे आदी मान्यवर उपस्थित होते. राकेश खैरनार हे येथील शेतकरी संघाचे सेवानिवृत्त शाखाधिकारी काशिनाथ खैरनार व दमंताबाई खैरनार यांचे सुपत्र आहेत. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कर्मचारी हेमंत खैरनार यांचे बंधू होत.