राकेश रोशन यांना ‘या’मुळे झाला कॅन्सर

0

मुंबई : बॉलीवूड सेलेब्रिटींमध्ये कॅन्सर हा रोग अधिक प्रमाणात आढळून येत आहे. सोनाली बेंद्रे, आयुष्मान खुराणाची पत्नी, इरफान खान या सगळ्यानंतर आता राकेश रोशन यांना कॅन्सर झाल्याची बातमी खुद्द ह्रतिक रोशनने दिली आहे. या बातमीमुळे चाहत्यांमध्ये खळबळ उडाली होती. राकेश रोशन यांना गळ्याचा कॅन्सर झाला आहे. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून अनेक दिग्गजांनी त्यांची तब्येत सुधारावी यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

या बातमीनंतर अनेकांना धक्का बसला, असाच धक्का रोशन यांचे मित्र अमोद मेहरा यांना बसला. एका मॅगझिनला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी याबाबत सांगितले. दोन महिन्यापूर्वी मेहरा आणि रोशन यांची भेट झाली होती. त्यावेळी ते तंदुरुस्त होते. त्यामुळे या बातमीने धक्का बसल्याचे ते म्हणाले. राकेश रोशन यांना धुम्रपानाची सवय होती, याचा खुलासा मेहरा यांनी केला. त्यांनी सिगारेट पिणे सोडावे यासाठी त्यांची पत्नी प्रयत्नशील होती. परंतु ते लपून छपून धुम्रपान करायचे.

राकेश रोशन हे दिड पॅकेटपर्यंत सिगारेट पित असत हे त्यांना ओळखणाऱ्या इतर मित्रांनेही सांगितले. आपल्या घरात एकांतात ते सिगरेट प्यायचे. याच कारणामुळे त्यांना गळ्याचा कॅन्सर झाल्याचे सांगितले जाते.