राखी बारवर धाड : २ महिलांसह ५ जणांवर कारवाई

0

उल्हासनगर: बारमध्ये मर्यादापेक्षा अधिक महिला ठेवून गि-हाईकांना आकर्षीत करण्याकरीता तोकडे कपडे परिधान करून अश्लिल कृत्य व हावभाव सुरू असताना अ‍ॅन्टी चैन स्नॅचिंग पथक कल्याण व विठ्ठलवाडी पोलिसांनी संयुक्तरित्या उल्हासनगरातील राखी बारवर धाड टाकून २ महिलांसह ५ जणांवर कारवाई केल्याची घटना घडली आहे.

शहरातील कॅम्प नं. ४ येथिल श्रीराम पेट्रोल पंपासमोर राखी बार असून त्या बारमध्ये मर्यादापेक्षा अधिक महिला ठेवण्यात आल्या असल्याची माहिती अ‍ॅन्टी चैन स्नॅचिंग कल्याणच्या पथकाला मिळाली होती. पो.उप.नि.हेमंत ढोले यांनी त्यांच्या पथकासह विठ्ठलवाडी पोलिस ठाणे गाठले. व.पो.नि.सुरेंद्र शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.धायगुडे, पो.कॉ.शिंदे व अ‍ॅन्टी चैन स्नॅचिंग कल्याणच्या पथकांनी राखी बारमध्ये रात्री ११ च्या सुमारास धाड टाकली. त्यावेळी त्याठिकाणी त्या बारमध्ये मर्यादापेक्षा २ महिला अधिक मिळून आल्या. त्या महिला तोकडे कपडे परिधान करून गि-हाईकांना आकर्षीत करण्याकरीता अश्लिल कृत्य व हावभाव करीत असताना मिळून आल्या. याप्रकरणी पो.उप.नि.ढोले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठलवाडी पोलिस ठाण्यात बार मालक रघु शेट्टी, बार मॅनेजर सुभाष शेट्टी, २ गि-हाईक, २ महिला अशा ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. अधिक तपास पो.उप.नि.धायगुडे करीत आहेत.