राजकारणातील भीष्म पितामहची एक्झीट चटका लावणारी

प्रा.उत्तम सुरवाडे, भुसावळ

भुसावळ : भुसावळातील सच्चा आणि निष्ठावंत शिवसैनिक कसा असावा याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय राजेंद्रजी दायमाजी.
भुसावळ तालुक्याने शिवसेनेला तीन जिल्हाप्रमुख दिले. अ‍ॅड.जगदीश कापडे, राजेंद्र दायमा आणि समाधान महाजन सर. महाराष्ट्रात आनंद दिघेनंतर सर्वात जास्त काळ शिवसेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून दायमाजी यांनी काम केले, पक्षाची बांधणी केली. त्याकाळी प्रवासाची साधने नव्हती तेव्हा सायकल मोटरसायकल, बुलेटवर जाऊन गावागावात कार्यकर्ते त्यांनी घडवले आणि त्यांच्या माध्यमातून शाखा काढल्या. त्याचा विस्तार ग्रामीण भागामध्ये जीवाचे रान करून केला. शिवसेनेचे नगरसेवकदेखील त्यांच्या कारकिर्दीमध्ये सर्वात जास्त शिवसेनेचे निवडून आले होते. नगराध्यक्ष पदीदेखील शिवसैनिकाला संधी मिळाली होती. शिवजयंतीची मिरवणूक असली असली की पोलिस प्रशासन आणि शिवसैनिक या दोघांमध्ये अतिशय चांगला समन्वय घडून दायमाजी आणायचे. त्यांचा प्रशासनावर दबदबा होता. मिरवणूक यांना परवानगी मिळायला जर पोलिस प्रशासनाने काचकूच केली तर धडाडीचा सच्चा शिवसैनिक अडायचा आणि शिवजयंती मिरवणूक कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार मोठ्या जोशात आणि जल्लोषात काढायचा. त्यांच्या असंख्य आठवणी मनात आहे.

मग आमदार म्हणून प्रमोशन का?
भुसावळ मतदारसंघातून 2009 मध्ये शिवसेना पक्षाकडून मी (प्रा.उत्तम सुरवाडे) उमेदवारी मागितली होती. दीपक धांडे यांच्या वॉर्डात माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम 15 ऑगस्टला राजेंद्रजी दायमा यांच्या वाढदिवसाच्या दिवशीच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात दस्तुरखुद्द पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनीदेखील गीत गाऊन सगळ्यांना देशभक्तीपर गीत गाऊन सगळ्यांना मंत्रमुग्ध केले होतं. त्या कार्यक्रमात कार्यकर्त्याला कसे बळ द्यावे, कार्यकर्त्याला पक्षाचा विस्तार करण्यासाठी कसे प्रोत्साहन द्यावे हे दायमाजी यांच्याकडून शिकण्यासारखे होते. प्राध्यापक आहात तुम्हाला आमदार म्हणून प्रमोशन का ? असे ते म्हटल्याचे आजही आठवते. अशा प्रकारे कार्यकर्त्यांना रीचार्ज करण्याची त्या काळात इच्छुक उमेदवारांमध्ये जणू काही त्यांनी स्पर्धाच लावली होती त्यामुळे भुसावळ मतदारसंघात सर्वात जास्त 54 इच्छुक उमेदवारांना त्यांनी कामाला लावलं होतं आणि खर्‍या अर्थाने चढाओढ सुरू झाली होती. उमेदवारीसाठी त्याचा वातावरण निर्मितीसाठी आणि पक्ष वाढीसाठी देखील त्यांनी मोठ्या खुबीने उपयोग करून घेतला.

तिकीट कापूनही जोपासली पक्षनिष्ठा
माजी आमदार दिलीप भोळे यांना पक्षप्रमुख हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी उमेदवारी जाहीर केली होती. नेत्यांच्या प्रचार सभेला स्वतः बाळासाहेब आले होते शिवसैनिकांनी लाकडे फळे आणून त्यांचे मोठे व्यासपीठ उभारले. धनुष्यबाणाचा आकार त्याला दिला होता आणि त्याच सभेमध्ये राजेंद्र दायमाजी यांना जाहीर झालेले तिकीट कापून माजी आमदार दिलीप भोळे यांना देण्यात आले मात्र त्यानंतरही दायमाजी नाराज नव्हे व त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून आमदार दिलीप भोळे यांना निवडून आले, याला म्हणतात खरा सच्चे आणि निष्ठावंत शिवसैनिक.

पक्ष विस्तारासाठी झोकले आयुष्य
माजी जिल्हाप्रमुख स्व.गणेश किराणा व राजेंद्रजी दायमा यांनी अक्षरशा जिल्हा पिंजून काढला होता आणि पक्षाच्या विस्तारासाठी त्यांनी स्वतःला झोकून दिले होते. माजी नगराध्यक्ष नीळकंठ पालक, माजी नगराध्यक्ष नीळकंठ भारंबे यांना नगराध्यक्षपदाची संधी त्यांच्या तालमीतच शिवसैनिक तयार झाल्यामुळेच मिळाली होती. त्यांनी अनेक शिवसैनिक घडवले. नव्या कार्यकर्त्यांना सतत मार्गदर्शन करण्याचा त्यांनी चंगच बांधला होता. निवडणुकीची यंत्रणा उभारावी, उमेदवार कसे निवडावे? कोणत्या बाबीकडे जास्त लक्ष द्यावे ? या सार्‍या बारीक-सारीक गोष्टी कार्यकर्त्यांना मोठ्या खुबीने ते समजून सांगत असत. त्यांच्याबद्दल एक आदरयुक्त भीतीदेखील शिवसैनिकांमध्ये होती. ते कमालीचे शिस्तीचे होते. एखादा शिवसैनिक बेशिस्तपणे वागत असल्यास
ते ते खडे बोल सुनावत असत. माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत आणि त्यांचे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. मी केव्हाही मुंबईला गेलो तेव्हा या ना त्या कारणाने सतत सावंत साहेबांची माझा संपर्क असायचा. सगळे विषय बाजूला सारून अरविंद भाई नेहमी राजेंद्रजी दायमा यांच्याबाबत आस्थेवाईकपणे विचारपूस करीत असत. भुसावळसारख्या तालुक्याच्या ठिकाणी राहून सुद्धा सेना भवन, मातोश्री इथपर्यंत आपले संबंध दायमाजी यांनी जोपासत वाढवले होते.

वाढदिवस अन् गुलाबराव ही भेटच
अलीकडे दायजी आजाराने त्रस्त होते. नीटसं बोलता येत नव्हते मात्र असे असलेतरी सुद्धा त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणारे शिवसैनिक 15 ऑगस्टला ठयांच्या वाढदिवशी शुभेच्छांचा वर्षाव करण्यासाठी आवर्जून त्यांच्या घरी जात असत. त्यांच्या खांद्यावर कार्यकर्त्याने भगवी शाल पांघरल्यानंतर त्यांना बोलता येत नसलं तरी त्यांचा चेहर्‍यावर विलक्षण आनंद झळकताना दिसून यायचा. एका वाढदिवसाला शुभेच्छा द्यायला मित्रांसह मी गेलो असता ते हसत म्हणाले की, 15 ऑगस्ट माझा जन्मदिवस असल्याने वाढदिवसाचा कार्यक्रम तुम्हीच काय भारत देशवासी माझा वाढदिवस साजरा करतात, सगळीकडे कसे उत्साहाचं वातावरण असते. दायमाजी यांचा वाढदिवस आणि गुलाबरावांची भुसावळ भेट ही जणू समीकरणच बनलं होतं. कितीही वाजता कार्यक्रम असला तरी गुलाबराव पाटील त्यांच्या वाढदिवसाला आवर्जून भुसावळात येणारच हे जणू ठरलेलेच होते. वाढदिवसाच्या कार्यक्रमात घुंगरू नाचे हे गीत गुलाबराव आमदार गुलाबराव पाटील यांनी गायलेले माझ्या अजूनही स्मरणात आहे.

कार्यकर्त्यांबद्दल नितांत आदर
कार्यकर्त्यांना प्रशिक्षित करावे व कसे मोठे करावे राजकारणाचे डावपेच शिकवावेत याचा उत्तम उदाहरण म्हणजे दायमाजी होते. नामदार गुलाबराव पाटील यांचे स्वीय सहाय्यक विश्वनाथ पाटील यांचे आवडते शिष्य यांना जिल्हा परीषद सदस्य निवडून आणण्यात राजेंद्र दायमाजी आणि स्वर्गीय मामा तुमचा खूप मोलाचा वाटा होता. विश्वनाथ पाटील यांचे कौतुक करताना ते म्हणायचे की इतर पक्षात काम करणारे कार्यकर्ते असतील सतराशे साठ मात्र सगळ्यांना पुरून पुरून उरेल असा केवळ विश्वनाथ माझा.