राजकारणातील मोठी घडामोडी; शरद पवारांकडे युपीएचे नेतृत्त्व?

0

नवी दिल्ली: महाराष्ट्रात भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्ष एकत्र आलेत. तिन्ही पक्षांना एकत्र आणण्यात राष्ट्रवादीचे नेते शरद पवारांची भूमिका मोठी होती. महाविकास आघाडीचे शिल्पकार देखील त्यांना संबोधले जाते. दरम्यान शरद पवारांकडे केंद्रातील विरोधकांची मोठ बांधण्याची जबाबदारी देण्यात येणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. दिल्ली सीमेवर शेतकरी आंदोलन सुरु आहे. कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी काल विरोधी पक्षांनी राष्ट्रपतींची भेट घेतली. शरद पवारांच्या नेतृत्त्वाखाली ही भेट झाल्याचे बोलले जात आहे. दरम्यान आता युपीएचे प्रमुख पद शरद पवारांकडे देण्याबाबतची राजकीय घडामोडी सुरु झाली आहे. राजकारणातील ही मोठी घडामोड आहे. युपीएचे अध्यक्षपद पवारांकडे देण्यात येणार आहे, मात्र अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाही.

सध्या कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे युपीएचे नेतृत्त्व आहे. पवारांकडे हा प्रस्ताव देण्यात आल्याचे देखील बोलले जात आहे, हा प्रस्ताव ते स्वीकारणार का? याकडे लक्ष लागले आहे.