मुंबई: विधानसभा निवडणुकीनंतर कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने सत्ता स्थापन करणे अवघड झाले आहे. युती झालेली आहे, दोन्ही पक्षांना मिळून सत्ता स्थापन करणे सोपे आहे. मात्र तरीही अद्याप सत्तेचे सूत्र जमलेले नाही. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी सत्ता स्थापनेसंदर्भात विधान केले आहे. राजकारणात कोणीही कधी कायमचा शत्रू नसतो किंवा मित्र नसतो, असे म्हणत त्यांनी सूचक इशारा दिला आहे. सध्या तरी विरोधी पक्षात बसणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. अजित पवारांच्या विधानानंतर राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
बारामती आणि तेथील नागरिक एक परिवार म्हणून आम्ही एकमेकांना साथ देत असतो. कितीही लाटा आल्या आणि गेल्या तरीही बारामतीकरांनी कधीही आम्हाला अंतर दिलेले नाही. सतत बारामतीकरांच्या ऋणामध्ये रहावेसे वाटते.