राजकारण्यांच्या मानसिकतेमुळेच बोदवडकरांना टंचाईचे चटके

0

बोदवडला पत्रकार परीषदेत अमोल देशमुख

बोदवड:- शहरवासीयांच्या पाचवीलाच पाणीटंचाई पूजली असल्याने त्यास राजकारण्यांच्या मानसिकेतप्रमाणेच ओडीएची कालबाह्य झालेली पाईपलाईन, पंपींग स्टेशन ते मुख्य समतल टाकी ते जलशुध्दीकरण केंद्रपर्यंतचे असंख्य लिकेज, बोदवडमध्ये जलकुंभाची असलेली कमतरता, अवैध नळ कनेक्शन कारणीभूत असल्याचा आरोप पाणी समितीचे संयोजक अमोल देशमुख यांनी पत्रकार परीषदेत केला. शहरातील शासकीय विश्रामगृहावर रविवारी त्यांनी पत्रकार परीषद घेतली.

सत्ताधारी मस्त, विरोधक सुस्त
देशमुख म्हणाले की, बोदवडला पाणीपुरवठा करणारी ओडीए 12 वर्षांपासून कालबाह्य झाली आहे. बोदवडकरांची तहान या योजनेने भागू शकते परंतु सत्ताधारी सुस्त, विरोधक मस्त अशी परिस्थिती आहे. शहरवासीयांना भर दिवाळीच्या काळात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले, मोर्चा काढावा लागला. ेराष्ट्रवादी काँग्रेसने बोदवड बंदचे आयोजन केले तर महिलांनी नगरपंचायतवर, तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. माजी मंत्री एकनाथराव खडसे, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांनी 27 जानेवारी रोजी पाणीपुरवठा योजनेचे उद्घाटन केले. 30 वर्षांपासून एकनाथराव खडसे प्रतिनिधीत्व करतात. जिल्हा परीषद 15 वर्षांपासून ते आतापर्यंत भाजपाच्या ताब्यात आहे. या प्रकाराला सर्वस्वी कोण जबाबदार हे जनतेला पूर्ण माहिती आहे. पाणीबानी बाबत जनतेने आंदोलन उभे करण्याची वेळ आली आहे. पाणी समितीच्या सदस्या संगीता सुधीर पाटील यांनी राजकारण बाजुला ठेवून समितीला सहकार्य करावे, असे सांगितले.

यांची होती उपस्थिती
यावेळी पाणी समितीच्या मनोरमा जैस्वाल, मंगला तळेगावकर, अर्चना देशमुख, अर्चना जोशी, शितल देशमुख, संदीप बडगुजर, अमोल शिरपूरकर, सुवर्णसिंग हजारी, गौरव अग्रवाल, अनिल बडगुजर, हर्षल बडगुजर, ललिता काळे, शोभा माटे, वैभव माटे आदी उपस्थित होते.