शिरसोली । गावाच्या विकासात प्रामुख्याने त्या गावातील पदाधिकार्यांचे मोठे योगदान असते. त्यासाठी गावातील पदाधिकार्यांनी जनतेचा विश्वास संपादन करून कुठलाही राजकीय द्वेशभाव न ठेवता एकोप्याने समन्वय ठेवून आपल्या गावाचा सर्वांगिन विकास साधावा, असे आवाहन माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर यांनी केले. शिरसोली प्र.न.च्या नवनिर्वाचित सरपंचा मायाबाई बोबडे यांच्या सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.
यांची होती उपस्थिती
यावेळी माजी सरपंच अर्जुन काटोले, हरि बोबडे उपसरपंच प्रणय सोनवणे, ग्रा.प. सदस्य अनिल पाटील, रामकृष्ण काटोले, द्वारकाबाई बोबडे, सिंधूबाई लक्ष्मण मोरे, अनिल पाटील, आमिन पिंजारी, संजय सुर्यवंशी, भगवान पाटील, हरिभाऊ बोबडे, प्रकाश मराठे, मुश्ताक पिंजारी, सईद पिंजारी, मिठाराम पाटील, सतिष पवार, रमेश पाटील, माधवराव चित्ते, उत्तम पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सुत्रसंचालन दापोर्याचे समाधान निकुंभ यांनी केले.