अहमदनगर या जिल्ह्याला संवेदनशिल आणि दहशतवादी जिल्हा म्हणून घोषित करावे, अशई मागणी काही दिवसांपुर्वि केंद्रिय सामांजिकन्याक राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली होती. ते ही मागणी का करत होते दे केडगाव मधअये नुकत्याच घडलेल्या राजकीय हत्याकांडाने स्पष्ट केले आहे. नगर जिल्ह्यात अनेक राजकिय नेत्यांची दहशत आहे. त्यातून अशा हत्या अपहर बलात्कार आणि दलित अत्याचाराच्या घटना घडत असतात.
कालच्या प्रकरणातील आमदार शिवाजी कर्डिले, अरुण जगताप आणि संग्राम जगताप आणि माजी महापैर कोतकर हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. या कुटुंबांची नगरमध्ये दादागिरी पुर्विपासूनच आहे. पण त्यांना एकदा कठोर शिस्तीच्या आयपीएस अधिकार्याने चाप लावला होता. त्याचे नाव कृष्णप्रकाश. कृष्ण प्रकाश यांनी कर्डिले यांच्यासह भानुदास कोतकर व त्यांच्या तिघा मुलांना बेड्या ठोकल्या होत्या. तेव्हापासून नगर जिल्ह्यातील सगळेच राजकारणी कृष्णप्रकाश यांना वचकून राहायचे. कालच्या घटनेत मात्र थेट पोलिस अधीक्षक कार्यालयात घुसून चौकशी चालू असलेल्या आपल्या नेत्याला पोलिसांसमक्ष घेवून जाण्याचे आणि पोलिस अधीक्षक कार्यालयाची तोडफोड करण्याचे धाडस या गुंड राजकारण्यांच्या समर्थकांनी केले आहे.
लॉटरीचालक अशोक लांडे खून प्रकरणात कृष्ण प्रकाश यांनी कोतकर आणि कर्डिले यांना बेड्या ठोकल्या होत्या. या खून प्रकरणात कोतकर यांच्यासह त्यांच्या तीन मुलांना जन्मठेप झाली. कर्डिले यांनाही कित्येक दिवस जेलमध्ये राहावे लागले. नंतरही त्यांना बरेच दिवस जिल्हाबंदी होती. मेडिकल ग्राऊंडवर सध्या भानुदास कोतकर हे जामिनावर तुरुंगातून सुटलेले आहेत. ते वास्तव्यास पुणे जिल्ह्यात असतात. मात्र तेथूनच ते सारा कारभार हाकत असल्याचे बोलले जाते. कृष्णप्रकाश यांनी दूध भेसळीत अडकलेल्या अनेक बड्या नेत्यांना तुरुंगात डांबले होते. त्यामुळे वैद्यकीय व इतर घोटाळे करणा-यांनाही त्यांनी सुतासारखे सरळ केले होते. साहजिकच त्यांचा धसका ग्रामीण भागातील नेत्यांनीही घेतला होता. रस्त्यावर वाहन चालकांना अडवून चिरीमिरी गोळा करणार्या वाहतूक पोलिस कर्मचार्यांवरही त्यांनी खंडणीचे गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहिले नव्हते.
केडगावमध्ये काल घडलेल्या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळावर पोचलेही नाहीत. या प्रकरणातील संवेदनशीलता त्यांच्या लक्षातच आली नाही. परिणामी आयपीएस केडरमधील अधिकार्यासह इतर पोलिस अधिकार्यांना शिवसेना समर्थकांच्या धक्काबुक्की व शिवीगाळीचा प्रसाद मिळाला. पोलिसांच्या वाहनांवरही त्यांनी दगडफेक केली. पब्लिक काँन्टॅक्ट कमी झाल्यानंतर अथवा जनतेमध्ये मिसळून सर्व घटकांशी समरस होणारी पोलिसिंग न केल्यानंतर काय होते, हे पोलिसांनी केडगावात शनिवारी अनुभवले. स्थानिक पोलिसांचा वचक कमी झाल्याने खुद्द अतिरिक्त पोलिस महासंचालकांना थेट नगरमध्ये ठाण मांडावे लागले आहे. सहकार, राजकारणांसह अनेक क्षेत्रांमध्ये वेगळे मापदंड तयार करणार्या नगर जिलह्याची छी तू होवू लागली आहे. पुन्हा एकदा या जिल्ह्यातील मोकाट राजकारण्यांना आमि गुंंडांना वेसन घालण्यासाठी कठोर शिस्तिच्याच अधिकार्याची गरज आहे.
– राजा आदाटे
वृत्तसंपादक जनशक्ति, मुंबई
8767501111