राजकीय नेते, संरक्षण संस्था आयसिसच्या लक्षावर !

0

नवी दिल्ली- देशातील राजकीय नेते, काही महत्वाच्या व्यक्ती तसेच संरक्षण संस्था दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलेल्या दहशतवाद्यांच्या टार्गेटवर असल्याचे एनआयएने स्पष्ट केले आहे. एनआयएच्या पोलीस महानिरिक्षकांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

एनआयएने दिल्ली आणि उत्तर प्रदेशमधील विविध १७ ठिकाणी बुधवारी छापे टाकल्यानंतर आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेच्या ‘हरकत-उल-हर्ब-इस्लाम’ या नव्या मॉड्यूलचा खुलासा झाला आहे. एनआयएला मोठा कट उधळण्यात यश आले आहे. या कारवाईनंतर एनआयएने पत्रकार परिषद घेऊन अधिक खुलासा केला आहे.