भुसावळ । शहरात वाहतुक नियंत्रण करणार्या पोलीस कर्मचार्यांनी तिबल शिट जाणार्या महाविद्यालयीन विद्यार्थीनीस अडविले असता हि विद्यार्थ्यांनी एका राजकीय पदाधिकार्याची मुलगी असल्याने लागलीच या पदाधिकार्याने आपल्या कार्यकर्त्यांसोबत बाजारपेठ पोलीस स्थानकाजवळ धाव घेऊन वाहतुक शाखेच्या महिला कर्मचार्यांशी हुज्जत घातली. व आपल्या राजकीय पदाचा धाक दाखविण्याचा प्रयत्न केला. परंतु वाहतुक शाखेचे निरीक्षक मुळूक यांना हा प्रकार समजात त्यांनी देखील लागलीच येऊन कायदा हा सर्वांना सारखाच असतो त्यामुळे नियम मोडल्यानुसार दंडाची आकारणी करुनच यांना सोडले.
समजूत घालण्याचा प्रयत्न
येथील आरपीआयचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांची मुलगी हि आपल्या मैत्रिणींसोबत वाहनावर तिबल शिट जात असताना वाहतुक शाखेच्या महिला कर्मचार्यांनी त्यांना अडविले असता याची माहिती मिळताच मकासरे याठिकाणी हजर झाले. त्यानंतर त्यांनी या कर्मचार्यांशी हुज्जत घालून अरेरावीचा प्रयत्न केला. मात्र याठिकाणी वाहतुक शाखेचे निरीक्षक मारोती मुळूक यांनी येऊन समजुत घालण्याचा प्रयत्न केला मात्र तरी देखील मकासरे ऐकून घेण्याच्या स्थितीत नसल्यामुळे पोलीसांनी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याचे सांगतात हा प्रकार आटोपता घेत 200 रुपयांची चलन पावती फाडून मकासरे यांनी ती गाडी आपल्या ताब्यात घेतली.