राजकीय प्रवास सैन्यातून दलदलीत!

0

माझा राजकारणात प्रवेश हा एक अपघात होता. 1991 साली, मध्यावधी निवडणूक लागल्या व राजीव गांधींनी काँग्रेसची उमेदवारी दिली आणि मी खासदार झालो. माझे वडील हे 3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते, नंतर आमच्या आग्रहाखातर 1980 साली शरद पवार काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे आम्ही कोणी शरद पवार यांचे विरोधक होतो असे नाही, पण कालांतराने मी काँग्रेसचा खासदार असताना भ्रष्टाचाराचा महामेरू बघितला आणि मी विरोधात उभा राहिलो. त्याचे कारण 1992चा सुधाकर नाईकांचा माफिया विरुद्ध लढा. या देशात एकच मुख्यमंत्री होऊन गेला ज्याने माफियाविरुद्ध थेट लढा दिला. ज्यामुळे भारताच्या राजकारणात भूकंप झाला.

1991ला खासदार झालो तेव्हा मी राजकारणातील व्यवस्थेबद्दल पूर्ण परिचित होतो. कारण देशाच्या सुरक्षेला सर्वात हानिकारक राजकारणी लोक असतात. बरेच लोक प्रत्यक्ष शत्रू राष्ट्रांचे हेर आहेत. आजदेखील बरेच नेते उख- या अमेरिकन गुप्तहेर खात्याचे हेर आहेत. जसे 1971च्या युद्धात इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात उख-चा हेर एक मंत्री होता. तो सर्व माहिती उख- ला पुरवायचा. आज शत्रू राष्ट्रांच्या हेरांची संख्या वाढली. त्यामुळे मंत्रिमंडळ खुनी चजछड-छढज कंपनीच्या ऐवजी शेतकर्‍यांना मारते. कारण च-छड-छढज अनेक अमेरिकन गुप्तहेर काम करत आहेत. 1991ला काही मंत्री दाऊदचे हस्तक होते. याची पूर्ण माहिती मी नाईक साहेबांना दिली. त्याचबरोबर शंकरराव चव्हाण आणि प्रधानमंत्री नरसिंहरावांना दिली. सुधाकर नाईकांनी माफियाला सळो की पळो केले. एकाच महिन्यात मुंबई माफिया मुक्त केली. त्याबरोबर नाईकांना काढण्याचे षडयंत्र सुरू झाले. 28 ऑक्टोबरला मी पंतप्रधानांना भेटलो आणि पत्र दिले. पत्रात स्पष्ट म्हटले की नाईकांना काढण्यासाठी मुंबईत उग्र दंगल घडवण्यात येईल, तरी माझ्या ूुचनेकडे दुर्लक्ष करण्यात आले. माफिया हा राज्यव्यवस्थेचा एक अविभाज्य भाग होता आणि आहे. गुप्तहेर खात्यात काम केल्यामुळे याची पूर्ण माहिती मला होती. कारण माफिया राजकीय नेत्यांच्या काळ्यापैशांची वसुली करतो आणि पांढरा ही करतो. हे मी म्हणत नाही तर गृहराज्य सचिव वोरांच्या अध्यक्षतेखाली व्होरा समिती मी गठित करायला लावली. त्यात सर्व गुप्तहेर खात्यातील प्रमुख होते. त्यांनी स्पष्ट म्हटले की भारतात राजकीय नेते, भ्रष्ट अधिकारी आणि माफियाचे समांतर सरकार राज्य करत आहे. मग घडायचे तेच घडले. बाबरी मशीद काँग्रेस-भाजपच्या संगनमताने पाडण्यात आली आणि सुधाकर नाईकांना काढण्यात आले. शरद पवार पुन्हा मुख्यमंत्री झाले आणि माफिया राज परत महाराष्ट्रात प्रस्थापित झाले. गुन्हेगारी संपवण्याची एकमात्र संधी गेली. असो! मी राजकारणात आलो का? माझा मूळ पिंड राजकारणाचं होता. पण 1971च्या युद्धामुळे मी भारावून गेलो आणि सैन्यात अधिकारी झालो. पुढे त्याच अनुषंगाने राजीव गांधींनी मला लोकसभा लढवण्यासाठी संधी दिली तेव्हा मी स्वीकारली आणि राजापूर मतदारसंघात 5 वेळचे खासदार प्रो. मधू दंडवते, भारताचे अर्थमंत्री यांच्याविरुद्ध निवडणूक लढवली व खासदार झालो. त्याच काळात 21 जून, 1991 ला श्रीधर नाईक माझा प्रचारप्रमुख याची कणकवलीत मुंबईतील गुंडाकरवी हत्या करण्यात आली. प्रमुख आरोपी नारायण राणे होते. जे नंतर मुख्यमंत्री झाले. त्यांना माझ्याच पक्षाचे शरद पवारांचे खास अरुण मेहतानी जमीन मिळवून दिली. हा मला फार मोठा धक्का होता. त्यात राजकारणातील नीचपणा स्पष्ट दिसतो.

त्याच संघर्षातून हिंसक राजकारण सिंधुदुर्गेत पेटले. आरोपीने रंगेहात पकडले. नारायण राणेंचे पेट्रोलपंप, घरदार लोकांनी जाळून टाकले. अनेक हिंसक घटना घडल्या. आणखी एक काँग्रेस युवा अध्यक्ष सत्यविजय भिसेचीसुद्धा हत्या झाली. त्यावेळी परत लोकांनी नारायण राणेचे घरदार पेटवून टाकले. काँग्रेसचे नेते भयभीत झाले. मला मग जशास तसे उत्तर द्यावे लागले. तत्कालीन काळातील शिवसेनेची गुंडगिरी मोडून काढावी लागली, पण नियती कशी क्रूर खेळ करते, मी आमदार असताना एक दिवस विरोधी पक्ष नेते नारायण राणेना काँग्रेसमध्ये आणण्याचा प्रस्ताव मला कळला. तब्बल 2 वर्षे आधी मी ते जाहीर केले. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राजापूर येथे कोर्टात माझ्यावर हल्ला केला. भ्याड पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई न करता मलाच पकडून कोर्टात नेले, पण राणेंचे कार्यकर्ते इतके मगरुर की त्यांनी कोर्टावरच दगडफेक केली. न्यायाधीश संतापले. ते बाहेर आले. कंपाउंडवरून उडी मारून मारेकर्‍यांवर चालून गेले. तेव्हा कुठे पोलिसांनी सर्वांना अटक केली. पण पुढे जाऊन 2 वर्षांनी नारायण राणे काँग्रेसमध्ये आले. मी विरोध केला त्यावेळी सोनिया गांधींनी मला विचारले की, राणे राष्ट्रवादीत गेले तर काय होईल? मग मी उत्तर दिले की काँग्रेसचे नुकसान होईल, पण त्यांना घेऊन काहीच फायदा होणार नाही. पक्षाने त्यांना घेतले, त्याबरोबर माझी कुचंबणा होऊ लागली. त्यांच्याबरोबर एकाच गाडीत बसताना शिसारी येत होती. राजापुरातील मारेकरी मुख्य माझ्याच गावातील भावकीतील दोघे होते सतीश सावंत व गोट्या सावंत. त्यामुळे मला सर्वांनाच माफ करावे लागले. त्याच काँग्रेसने प्रामाणिक कार्यकर्त्यांचा बळी घेतला. माझे सर्व निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ते हतबल झाले. पुढे जाऊन नाईक कुटुंबाने काँग्रेससाठी बलिदान केले. त्यांना शिवसेनेत जावे लागले व श्रीधर नाईकांच्या पुतण्याने वैभव नाईकने राणेंचा पराभव केला. त्यात आम्ही पूर्ण मदत केली व राणेंचा मुलगा लोकसभेला उभा होता त्यालाही जुन्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पाडला. या सर्व घटनाक्रमात माझ्या पक्ष्याच्या मुख्यमंत्र्यांनी राणेंना मदत केली. विशेषतः सुशील कुमार शिंदेंनी म्हणून 2004ला मी हट्टाने सोनिया गांधींना त्यांना काढायला लावून विलासराव देशमुखना मुख्यमंत्री करायला लावले.

राजकारणात आजचे शत्रू उद्याचे मित्र असतात, हे मी अनेकदा ऐकले होते, पण माझ्याबाबतीत काही विचित्र झाले. पूर्ण कोंकणात फक्त माझ्या लोकसभा मतदारसंघात काँग्रेस शिल्लक राहिली. ती निष्ठावंतांची काँग्रेस राणेंकडे गहाण टाकली व आज राणेच काँग्रेस सोडून गेला व कोंकणातील काँग्रेस संपली. आता मला परत काँग्रेसमध्ये बोलवत होते कशासाठी? तर ओसाड गावचा पाटील बनायला. पूर्ण देशभर काँग्रेसची अशीच वाताहत झाली आहे. आ. सुनील देशमुख हा काँग्रेसमध्ये युथ काँग्रेस अध्यक्ष होता, शरद पवाराविरोधातील लढाईत तो आघाडीवर होता. 1999 साली त्याचे तिकीट कापण्यात आले, त्यावेळेला मी रात्री सोनिया गांधींकडे जाऊन त्यांना तिकीट द्यायला लावले ते आमदार झाले, मंत्री झाले, चांगले काम केले. पण आज भाजपच्या आमदार आहेत. अशा दु:खद गोष्टी मी पुढे जाऊन लिहिणार आहे. पण मुद्दा हा आहे की माझ्यासारखा कुठलेही पद न मागणारा देशासाठी निस्सीम सेवा करणार्‍या माणसाला 2007 ला आमदारकीचा राजीनामा देऊन काँग्रेस सोडावी लागली. याचा विचार काँग्रेसच्या नेतृत्वानी केला की नाही माहीत नाही. पण अशामुळे काँग्रेस नष्ट झाली आणि ती कधीही उभी राहणार नाही याची मला खात्री आहे. काँग्रेस सोडल्यानंतर मी पर्याय शोधत होतो, पण योग्य पर्याय मिळाला नाही पण अचानक अरविंद केजरीवाल यांच्या राजकारभारचा अभ्यास करण्याचा योग आला. त्यांचे सर्वात मोठे काम भ्रष्टाचार नष्ट करणे. त्यामुळे दिल्ली सरकारचा अर्थसंकल्प आता 38,000 कोटींपासून 70,000 कोटींवर झाला आहे. जेणेकरून मोफत आरोग्य, मोफत पाणी, सरकारी शाळा पंचतारांकित झाल्या. अशा शाळांत स्विमिंग पूल, व्यायाम शाळा निर्माण झाल्या. मुंबईत जेथे 4500 रु. वीजबिल येते तेथे फक्त दिल्लीत 1200 रु. येते. राजकारण काय वाईट नसते. त्यात घुसलेली बिनडोक माणसे आणि गुन्हेगार मंडळी वाईट असतात, तरी स्वच्छ राजकारण झाले पाहिजे.

अपघाताने राजकारणात आलो…
माझा राजकारणात प्रवेश हा एक अपघात होता. 1991 साली, मध्यावधी निवडणूक लागल्या व राजीव गांधींनी काँग्रेसची उमेदवारी दिली आणि मी खासदार झालो. माझे वडील हे 3 वेळा शेतकरी कामगार पक्षाचे आमदार होते, नंतर आमच्या आग्रहाखातर 1980 साली शरद पवार काँग्रेसमध्ये आले. त्यामुळे आम्ही कोणी शरद पवार यांचे विरोधक होतो असे नाही, पण कालांतराने मी काँग्रेसचा खासदार असताना भ्रष्टाचाराचा महामेरू बघितला आणि मी विरोधात उभा राहिलो. त्याचे कारण 1992 चा सुधाकर नाईकांचा माफिया विरुद्ध लढा. या देशात एकच मुख्यमंत्री होऊन गेला ज्याने माफियाविरुद्ध थेट लढा दिला. ज्यामुळे भारताच्या राजकारणात भूकंप झाला.

– ब्रिगेडिअर सुधीर सावंत
9987714929