जळगाव जिल्हा दोडे गुर्जर संस्थेच्यावतीने गुणवंतांचा गौरव
जळगाव- कुटूंबाचा सत्कार हा प्रेरणादायी असतो.समाजात शिक्षणाचे महत्व कळायला लागले आहेत.गुणवंत मुलं भरपूर आहेत.गुणवंत मुले समाजाचे पुढे आले पाहिजेत.आपल्या शुभेच्छामुळे गुणवंतांना बळ मिळते. जळगाव दोडे गुर्जर संस्थांनची भव्य इमारत उभी राहण्यासाठी राजकीय मतभेद विसरून सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन राज्याचे सहकार राज्यमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केले.
जळगाव जिल्हा दोडे गुर्जर संस्थानच्या वतीने गुणवंतांचा गौरव सोहळा जळगावात आयोजित करण्यात आला.यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानीअंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष गोरख पाटील, माजी जि. प. सदस्य इंदिराताई पाटील,दोडे गुर्जर समाजाचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,उपाध्यक्ष अशोक जाधव,सचिव डॉ राधेश्याम चौधरी, जिल्हा परिषदेचे आरोग्य सभापती दिलीप पाटील,डॉ चंद्रशेखर पाटील,जळगाव बाजार समितीचे माजी सभापती लकी टेलर,जिल्हा परिषद सदस्य गोपाळ चौधरी,यशवंत पटेल,माजी शिक्षण सभापती पी. सी. पाटील, धुळे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य वसंत चौधरी,नंदकिशोर पाटील,शिवाजीराव पाटील,पन्नलाल पाटील,शिवाजी पाटील,संजय पाटील ,देविदास पाटील,कांतीलाल पाटील, उपस्थित होते.प्रास्ताविक संस्थेचे सचिव डॉ राधेश्याम चौधरी यांनी केले.सूत्रसंचालन कवी प्रफुल्ल पाटील तर आभार उल्हास जाधव यांनी केले.
यांचा झाला सन्मान
नायब तहसीलदार प्रतिभा चौधरी,विजय पाटील,जनार्दन पवार,अॅड. प्रकाश पाटील,राजेंद्र पाटील,कवी रमेश जे पाटील,ज्ञानेश्वर पाटील,निबादास पाटील,संकुलता पाटील,डॉ सारिका पाटील,डॉ दीपक पाटीलयोगेश पाटील,मोहित पाटील,डॉ गौरव सूर्यवंशी,संजय पाटील,ह भ प पुरुषोत्तम महाराज,ह भ प सुशील महाराज,दीपमाला चौधरी,कमलाकर पाटील,पाणी फाऊंडेशन टीम निम ता अमळनेर,डॉ प्रशांत पवार,दिव्य मराठीचे ब्युरो चिप विकास पाटील,साहित्यिक गिरीश पाटील,ह भ प भरत चौधरी,तसेच गुणवंत मुलांमध्ये गौरव संजय पाटील, वेदांत पाटील,लोकेश पाटील,निखिल पाटील,राहुल पाटील,मयूर पाटील,आशिष पाटील,गौरव वासुदेव पाटील,रोहित पाटील,सचिन पाटील,खुशी जाधव,काजल चव्हाण,महेंद्र पाटील,भूषण पाटील,शुभम पाटील सह दहावी,बारावी,स्कॉलरशिप,एम टी एस,स्पर्धा परीक्षेत गुणवंत मुलांचा सत्कार करण्यात आला.
यांनी केली आर्थिक मदत जाहिर
ना. गुलाबराव पाटील यांनी इमारत उभी करण्याचे आवाहन करताच उपस्थित समाज बांधवांपैकी व्ही. के. पाटील,निबादास पाटील,अॅड. वीरेंद्र पाटील,प्रा रवींद्र पाटील,हिरालाल गोरख पाटील,नारायण गुर्जर,यांनी प्रत्येकी अकरा हजार तर ना. गुलाबराव पाटील यांनी दोन लाख,अंबरनाथ चे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांनी चार लाख रुपये,विश्वस्त मनोज पाटील यांनी चार लाख,राजेश रुपसिंग पाटील यांनी 25 हजार,यशवंत पटेल,रमाकांत चौधरी यांनी एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.