राजकीय वाद विसरून भूमिका घेणे गरजेचे

0

पुणे । निवडणुकीत व राजकरणात प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमीका असतात. मात्र, व्यक्तीगत सलोखा ठेवणे गरजेचे आहे. राजकीय विचारधारणेच्या बाहेर राहून राज्याच्या हितासाठी पक्षीय वाद विसरून भूमीका घेणे गरजेचे आहे. त्यावेळी व्यक्तिगत सलोखा ठेवणे गरजेचे आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी व्यक्त केली.

धनंजय स्मृती प्रतिष्ठानाच्या वतीने कै. धनंजय थोरात आर्दश कार्यकर्ता पुरस्कार पवार यांच्या हस्ते अन्नपुर्णाच्या संचालिका डॉ. मेधा पुरव सामंत, शिल्पकार विवेक खटावकर व हर्षा शहा यांना प्रादन करण्यात आला. यावेळी पालकमंत्री गिरीष बापट, उल्लासदादा पवार, वात्रटिकाकार रामदास फुटाणे, अंकुश काकडे, मोहन जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

राजकारणात हवे खेळीमेळीचे वातावरण
राजकरणात सर्वांनी एकत्र असले पाहिजे. निवडणुकीच्या वेळी गिरिष बापट आणि अंकुष काकडे उभे राहिले, तर नक्की कोण कोणाची मदत करत आहेत. हे आपल्याला कळणार नाही. मात्र निवडणूकी दरम्यान प्रत्येकजण आपआपल्या विचारधारणेने काम करत असतो. निवडणूक झाल्यावर पुन्हा एकदा सर्वजण एकत्र येतात. असे खेळीमेळीचे वातावरण राजकरणात असले पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. माझ्या बद्दल नेहमीच लोकांना गैरसमज होत असतो, असेदेखिल त्यांनी पुढे सांगितले.

जुन्या आठवणींना दिला उजाळा
आपला देश कृषी प्रदान असल्याची चर्चा केली जाते. मी कृषी मंत्री असताना परदेशातून गहू आणि तांदूळ आणावा लागावा लागला होता. परंतु त्यानंतरच्या 4 वर्षात आयात करणारा भारत जगात निर्यात करणारा देश झाला. सर्व शेतकर्‍यांच्या मदतीने हे शक्य झाले होते, असे सांगत पवार यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. पवारांमुळे पहिले शिल्प बनवण्याची संधी मिळाली. आणि त्यांच्यामुळेच मी घडलो असल्याच्या भावना शिल्पकार विवेक खटावकर यांनी व्यक्त केल्या. तसेच हर्षा शहा यांनी उल्लासदाद पवार आणि गिरीष बापट यांच्या समवेतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. डॉ. मेधा पुरव सामंत यांनी मनोगत व्यक्त केले.

कोअर कमिटीच्या बैठकीत राणेंचा विषय येणार
भारतीय जनता पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत नारायण राणे यांचा विषय येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री निर्णय घेण्यासंदर्भात परिपक्व व सक्षम आहेत. ते पक्षाच्या हिताचा विचार करणारे आहेत. यामुळे नारायण राणे यांचा विषय पक्षाच्या कोअर कमिटीत आल्यावर मुख्यमंत्री व इतर त्यावर चर्चा करतील. नारायण राणेंचाच निर्णय आजवर होत नव्हता. आता त्यांनी निर्णय घेतला आहे. यामुळे याचा निर्णय आता घेतला जाईल.
– गिरीष बापट, पालकमंत्री