राजकीर वाद पुन्हा चव्हाट्यावर

0

शहादा । खासदार डॉ. हिना गावित व आमदार उदेसिंग पाडवी यांच्यातील मतभेद सर्वश्रृत आहेत. या दोघांमधील हे मतभेद विकास कामांच्याभूमिपूजन सोहळ्यानंतर पुन्हा एकदा उफाळून आले. दोघांमधील राजकीय वाद शनिवारी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले. शनिवारी शहादा तालुक्यातील पिंगाणे येथील पुलाचे उद्घाटन व शहादा शहरातील विकास कामांचे भूमिपूजन कार्यक्रम संपल्यानंतर रात्री शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या समोर खा. डॉ. हिना गावीत व आ. उदेसिंग पाडवी यांच्यात जोरदार शाब्दीक खडाजंगी झाल्याचे वृत्त आहे. पुलाच्रा उद्घाटनाबाबत मनमानी केल्राच्रा कारणावरुन हा वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, शहादरात रा वादाची चर्चा रंगत आहे.

आमदार पाडवींचा पाठपुरावा
प्रत्येक पुलाच्या कामासाठी आमदार पाडवी यानी पाठपुरावा केला निधी मिळविला हे श्रेय त्यांचे आहे. तरी भाजपाच्या दोन नेत्यामधील वाद भविष्यात येणार्‍या निवडणुकीसाठी धोक्याचा इशारा आहे. नंदुरबार लोकसभा मतदार संघात व शहादा विधान सभा मतदार संघात गटबाजी होइल आमदार पाडवी यानी मतदार संघात कमालीचा संपर्क ठेवला आहे. आमदार पाडवी सोबत कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. केलेली कामे व विरोधी नेत्यांची साथ ही त्यांचा जमेची बाजु आहे.

खासदारांच्या नावाचा उल्लेख नाही
गेल्या दोन वर्षापासुन खा डॉ. हिना गावीत व आ पाडवी यांच्यात राजकीय मत भेद सुरु आहेत अक्षरश: दोन्ही नेते आरोप प्रत्यारोप करतात हे सर्वशृत आहे. दोन्ही नेते एकमेकाना कार्यक्रमात डावलतात या दोन्ही नेत्यामधील वाद संपुष्टात आणण्याचा वरिष्ठ पातळीवरुन पक्षश्रेष्ठींनी प्रयत्न केला, पण अद्याप तरी यश आलेले नाही. 3 मार्च रोजी पुलाचा उद्वघाटन कार्यक्रम पत्रिकेत खा.डॉ. हिना गावीत यांचे नाव नव्हते तरी त्या कार्यक्रमाला आल्या. पिंगाणे गाव व शहादा शहर हे आमदार पाडवी यांच्या मतदार संघातील आहे हे जरी सत्य असले तरी वरील बांधण्यात आलेला पुल हा खासदार हिना गावीत यांच्या लोकसभा मतदार संधातील गावातला आहे म्हणुन त्याना बोलाविणे क्रमप्राप्त होते.

कार्यकर्ते संभ्रमात
पुलाचा कामासाठी कोणी निधी दिला? कोणी पाठपुरावा केला पेक्षा दोन्ही नेत्यामध्ये समनवय असणे गरजेचे आहे या वादामुळे कार्यकर्ते संभ्रमात असुन त्यानी मौन पाळले आहे वादाचे खरे कारण पुलाचा उद्घाटन कार्यक्रमाचा असल्याचा प्रतिक्रिया कार्यकर्यामध्ये होत्या. गोमाई नदीवरील चारही पुलांचा उद्घाटनात खासदार हिना गावीत यांचे नाव कोठेही नव्हते.

शहरात चर्चा
खा गावीत ह्या अनुभवी नसल्या तरी त्यांचे पिताश्री आ. डॉगावीत यांचे पाठबळ असल्याने ते नंदुरबार लोकसभा मतदार संघात आपली राजकीय पायेमुळे पक्की करण्याचा प्रयत्न करीत आहे. जिल्ह्याचे पालक मंत्री यानी दोघांची समजुत घालण्याचा प्रयत्न केला. तळोदा येथील भाजपा ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष विश्‍वनाथ कलाल व प्रदेश कार्यकारणी सदस्य डॉ. शशिकांत वाणी हे देखील तळोदा नगरपालिका निवडणुकीपासुन नाराज आहेत त्यांचे कार्यही मोठे आहे. भाजपा नेत्यामध्ये सध्या असलेली राजकीय गटबाजी भाजपा पक्षश्रेष्ठींना विचारात टाकणारी आहे. मात्र शासकीय विश्राम गृहात खासदार गावीत व आमदार पाडवी यांच्या वादाची खमंग चर्चा शहरात आहे. शनिवारी पुलाच्रा लोकापर्णासह शहाद्या विविध विकास कामांच्या भूमिपूजन सोहळा पार पडला.