राजगुरुनगरमध्ये महिलांसाठी हेरिटेज वॉक

0

राजगुरुनगर । जागतिक महिला दिनानिमित्त राजगुरुनगर नगरपरिषद, चैतन्य संस्था व आपलं राजगुरुनगर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांसाठी राजगुरुनगर शहर – हेरिटेज वॉकचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. परिसर अभ्यासक राजेंद्र सुतार यांनी गाईडची अभ्यासपूर्ण भूमिका पार पाडली. याप्रसंगी नगराध्यक्ष शिवाजी मांदळे, नगरसेवक सचिन मधवे, नगरसेविका रेखा क्षोत्रीय, डॉ. सुधा कोठारी, अनिल बोर्‍हाडे, तेजस सुतार यांच्यासह ग्रामीण महिला स्वयंसिद्ध संघाचे सभासद उपस्थित होते.

ऐतिहासिक व धार्मिक वास्तूंना भेट
ग्राम खेड ते राजगुरुनगर शहर अशा झालेल्या बदलाचा वैभवशाली इतिहास या निमित्ताने सर्वांपुढे आला. यात प्राचीन काळापासून गावांशी निगडीत असलेल्या ऐतिहासिक व धार्मिक वास्तुंची भेट व माहिती जाणून घेण्याची संधी महिलांना मिळाली. राजगुरुनगरमधील शनी मंदीर, गावची वेस, दिलावर खान घुमट, दिलावर खान धरण, जुना मोटर स्टँड, हुतात्मा राजगुरु शासकीय स्मारक, हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ, श्री उमा माहेश्‍वरी शिवालय, श्री रामेश्‍वर शिवालय, श्री ब्रह्मेश्‍वर शिवालय, श्री केदारेश्‍वर शिवालय, श्री विष्णू मंदिर, श्री सिद्धेश्‍वर मंदिर, श्री खडकेश्‍वर मंदिर, ग्रामदैवत श्री भोपळबुवा मंदिर, कुस्ती मैदान, रामघाट आदी पुरातन ठिकाणी भेटी देण्यात आल्या. या प्रकारच्या अनोख्या उपक्रमाचे प्रथमच आयोजन करण्यात आल्याने महिला वर्गाने समाधान व्यक्त केले.