राजगुरूनगर । डेंग्यू, चिकुनगुनिया आणि इतर आजारांच्या रुग्णाची संख्या राजगुरुनगरमध्ये दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी नव्याने नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारलेले नगराध्यक्ष शिवाजी मांदळे यांनी पुढाकार घेत शहर निरोगी करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली. राजगुरुनगर नगरपरिषद, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि शहरात खासगी प्रॅक्टीस करणारे डॉक्टर यांची बैठक घेतली. शहतील डेंग्यू आणि चिकुनगुनिया या आजारांवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी खासगी, सरकारी डॉक्टरांचा सहभाग आणि उपाययोजना याबाबत चर्चा करून लगेचच उपययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली.
स्वच्छतेबाबत जनजागृती
सरकारी व खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून शहरातील डेंग्यू आणि चिकुनगुनिया आजाराचे उच्चाटन केले जाणार आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून आजारांबाबत आणि स्वच्छतेबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच शहरात सर्वत्र फोगिंगच्या मशीनद्वारे फवारणी सुरू केली आहे. खासगी डॉक्टरांकडून रुग्णाचा अहवाल नगरपरिषदेला देण्याचे ठरले आहे. नागरिकांना सर्वतोपारी आरोग्याच्या सुविधा पुरविण्यात येतील, अशी ग्वाही मांदळे यांनी दिली. बैठकीनंतर लगेचच प्रभाग क्र.16 मध्ये फोगिंग मशिनच्या सहाय्याने औषध फवारणी करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देव्हरकर यांनी केले तर उपनगराध्यक्षा वैशाली बारणे यांनी आभार मानले.
बैठकीला मान्यवरांची हजेरी
या बैठकीला भाजपचे तालुका अध्यक्ष अतुल देशमुख, उपाध्यक्ष संदीप वाळूंज, उपनगराध्यक्षा वैशाली बारणे, आरोग्य सभापती संपदा सांडभोर, नगरसेवक रेखा क्षोत्रीय, संदीप सांडभोर, मनोहर सांडभोर, शंकर राक्षे, सचिन मधवे, राहुल आढारी, किशोर ओसवाल, स्नेहल राक्षे, सारिका घुमटकर, संपदा सांडभोर, निलोफर मोमीन, नंदा जाधव, संगीता गायकवाड, स्नेहलता गुंडाळ, अर्चना घुमटकर, सुरेश कौदरे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत साळवे, राजगुरुनगर आरोग्य केंद्राचे डॉ. उदय पवार, डॉ. माणिक बिचकर, डॉ. सुभाष खडके, डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. सीमा घुमटकर, डॉ. सुनील सुलाखे, एस. जी. मोहिते, एस. आर. मोरे, निलेश सोनवणे, विष्णू बोर्हाडे यांच्यासह मोठ्या संख्येने डॉक्टर, आरोग्य विभागाचे कर्मचारी नगरपरिषदेचे कर्मचारी उपस्थित होते.
डेंग्यू, चिकुनगुनिया हे आजाराचे समूळ नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्यात आली असून सरकारी आणि खासगी डॉक्टरांच्या माध्यमातून उपयायोजना सुरू केली आहे. नगरपरिषदेने याबाबत नियमावली तयार केली आहे. शहरातील नागरिकांनी या आजारांवर उपाय म्हणून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
– संपदा सांडभोर
सभापती, राजगुरूनगर नगरपरिषद