राजगुरूनगर । राजगुरूनगर बार असोसिएशनच्या अध्यक्षपदी अॅड. दिलीप करंडे तर उपाध्यक्षपदी अॅड. वैभव कर्वे व अॅड. कृष्णा भोगाडे यांची निवड झाली आहे.
खेड प्रथमवर्ग न्यायालाय व अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात काम करणार्या राजगुरूनगर वकील(बार) असोसिएशनच्या अध्यक्ष उपाध्यक्ष व कार्यकारिणीची निवडणूक बार असोसिएशनच्या सभागृहात नुकतीच संपन्न झाली. निवडणूक प्रक्रिया अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार व लोकल ऑडीटर या पदासाठी झाली तर उर्वरितपदे बिनविरोध झाली आहेत. या निवडणुकीत अध्यक्षपदी अॅड. करंडे हे भरघोस मतांनी निवडून आले. खजिनदार अॅड. विठ्ठल नाणेकर, लोकल ऑडिटर अॅड. किरण दौंडकर बिनवरीरोध निवडून आले आहेत. अॅड. बिभीक्षण पडवळ, अॅड. मालिनी भागवत-शिंदे सचिव तर अॅड. माणिक वायाळ, अॅड. मोहिनी केदारी, अॅड. मनीषा वाघ, अॅड. संतोष माळी यांची सदस्यपदी निवड झाली आहे. माजी अध्यक्ष अॅड. अनिल राक्षे यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव यांच्यासह कार्यकारिणी सदस्यांचा सत्कार केला.