A knife In the Back Of A Laborer in Rajdehre : Crime Against One चाळीसगाव : श्रींच्या स्थापनेचा जल्लोष सुरू असताना ऊस तोड करणारे दाम्पत्य बाप्पांची पूजा करीत असताना आरोपीने ऊस तोडीच्या मजुरीच्या पैश्यांवरून कामगाराच्या पाठीत सुरी खोपसली. ही धक्कादायक घटना चाळीसगाव तालुक्यातील राजदेहरे गावठाण येथे 31 रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात एकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
ऊस तोडीच्या पैशावरून खुपसला सुरा
चाळीसगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ भामा राठोड (35, रा.राजदेहरे गावठाण, ता.चाळीसगाव) हे आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. ऊस तोडणीचे काम करून आपला उदरनिर्वाह करतात. ऊस तोडणीच्या मजूरीचे पैसे मागण्याच्या कारणावरून संशयीत सुभाष लालू राठोड (रा.राजदेहरे गावठाण, ता.चाळीसगाव) याने एकनाथ राठोड याच्यासह त्याच्या पत्नीला शिवीगाळ करून त्याच्या हातातील सुरीने पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली. विशेष म्हणजे राठोड दाम्पत्य गावातील गणपतीची मिरवणूक आल्यानंतर आरती व पूजा करीत असताना ही घटना बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडली. या संदर्भात एकनाथ राठोड याने चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष लालू राठोड (रा.राजदेहरे गावठाण, ता.चाळीसगाव) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक शांतीलाल पगारे करीत आहे.