श्रीनगर – जम्मू काश्मीरच्या २ दिवसीय दौऱ्यावर आलेले केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आज सीमेवरील स्थानिक रहिवाशांची भेट घेणार आहेत. सिंह कुपवाडाला भेट देतील जेथे मागील काही आठवड्यांपासून शस्त्रसंधी उल्लंघन होत असून त्यामुळे तेथील रहिवाशांना स्थलांतर करावे लागले आहे. सशस्त्र सेना आणि जम्मू काश्मीर पोलिसांची स्तुती करताना सिंह म्हणाले, की सैन्य व पोलिसांसह आपले सुरक्षा दल अत्यंत संयमाने काम करत आहे, हे म्हणायला मला कोणताही संकोच वाटत नाही.