राजपुत व भिल्ल समाज जातीच्या दाखल्यांपासून वंचित

0

लोहारा। येथील राजपूत (तागवाले) हा समाज मात्र शैक्षणिक दृष्ट्या तसेच आर्थीक दृष्ट्या कोसो दुर राहिला आहे. या समाजाच्या लोकांना पुर्वी एनटीचे जातीचे दाखले मिळालेले आहेत. मात्र आत्ताच्या ऑनलाईन पद्धतीमध्ये येथील राजपुत समाजाच्या मुलांना एनटी किंवा ओबीसी जातीचे दाखले मिळत नसल्याने या मुलांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. आधीच आर्थीक दृष्ट्या मागसलेला समाज शिक्षणापासून वंचित राहत असल्याने या समाजाची प्रगती खुंटलेली असल्याचे चित्र पहावयास मिळते. या समाजाला पूर्वीपासुन तागवाले भामटे म्हणूनच संबोधले जात आलेले असतांना त्यांना मात्र कोणत्याच आरक्षणाचा लाभ मिळत नसल्याने पाचोरा विभागाचे प्रांताधिकारी यांनी लक्ष घालुन त्यांना किमान ओबीसी प्रवर्गाचे तरी जातीचे दाखले मिळवून द्यावेत, अशी मागणी या समाजाने केली आहे.

लोहारा परीसरात कॅम्प लावून दाखले वाटपाची मागणी
भिल्ल समाजाच्या मंडळीकडे 1950 पूर्वीचे भिल्ल जातीचे पुरावेच सापडत नाहीत. त्यामुळे या समाजाच्या विद्यार्थ्यांनादेखील पुढील शिक्षणापासुन वंचित रहावे लागत आहे. एकीकडे सरकार म्हणते शिक्षणापासुन कोणीही वंचित राहताकामा नये, मात्र येथे मात्र हा समाज आपल्या मुलाबाळांना शिकवू शकत नाही. आधीच या आदीवासी समाजाची मंडळी जंगलात वास्तव्य करून मोलमजुरी करून आपल्या कुटुबाचे पालन पोषण करीत असतो. त्यामुळे त्यांच्या मुलांचे जन्मदाखले देखील मिळणे कठीण होते. खर्‍या अर्थाने 100 टक्के आदिवासी असतांना देखील केवळ जातीचा दाखला मिळत नसल्याने त्यांचे फारच मोठे नुकसान होत आहे. समाज आर्थीकदृष्ट्या मागे राहिला आहे. या समाजाच्या या महत्वाच्या प्रश्‍नाकडे देखील लक्ष देवून प्रशासनाने लोहारा येथे विशेष कॅम्पचे आयोजन करून या समाज्याच्या सर्वाना एन.टी. प्रवर्गाचे जातीचे दाखले प्राप्त करून द्यावे, अशी मागणी होते आहे.