भुसावळ- राजपुत समाजाच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, केंद्रीय लोकसेवा आयोग, नेट-सेट परीक्षेत विशेष प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंताचा प्रशस्तीपत्र देवून रविवारी दुपारी एक वाजता गुणगौरव केला जाणार आहे. शहरातील गजानन महाराज नगरातील कोळी समाज मंगल कार्यालयात होणार्या या गुणगौरव सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य सजनसिंग पवार असतील. कार्यक्रमात राजपूत समाजाला सरसकट जातीचे प्रमाणपत्र मिळावे याविषयावर विचारमंथन केले जाणार आहे.
यांची राहणार प्रमुख उपस्थिती
आमदार किशोरअप्पा पाटील यांचे हस्ते गुणगौरव केला जाणार आहे. सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून धुळे अपर जिल्हाधिकारी राजेंद्र भगवान पाटील, धरणगाव तहसीलदार चंद्रजीतसिंग राजपूत, गटविकास अधिकारी विलास भाटकर, यावलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय परदेशी, डॉ.रेखा पाटील, डॉ.राहुल पाटील, एस.आर.पाटील, योगेद्रसिंग पाटील, एफ.एम.महाजन, नगरसेवक महेंद्रसिंग ठाकूर यांची उपस्थिती राहणार आहे.
यांचा होणार विशेष गौरव
गुणगौरव सोहळ्यात रोहितकुमार राजपूत, रूपेशसिंग राजपूत, दीपक गिरासे, कुलदीप पाटील, नरवीरसिंग रावळ यांचा विशेष गौरव केला जाणार आहे. या गुणगौरव सोहळ्याचे संयोजक भगतसिंग पाटील व प्रवीणसिंग पाटील असून समस्त राजपुत समाजाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. समाज बांधवानी उपस्थितीचे आवाहन आयोजक समितीने केले आहे.