राजपुत समाज मंडळातर्फे संजय राजपुत यांना पुरस्कार

0

शहादा । येथील तालुका राजपुत समाज मंडळाचे अध्यक्ष व पत्रकार संजय राजपुत यांना स्व. जिसकोरबाई कुवर भगवानसिंग गिरासे प्रतिष्ठानतर्फे नुकताच सामाजिक शैक्षणिक व पत्रकारिताक्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल यशश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. धमाणे ता शिंदखेडा येथे झालेल्या कार्यक्रमात उद्योगपती रावल यांना पुरस्कार देण्यात आला.

समाजबांधवांकडून करण्यात आले अभिनंदन
याप्रसंगी व्यासपीठावर सुर्यभान राजपुत दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नारायण पाटील, शिंदखेडा माजी पस सभापती जिजाबराव पाटील , प्राचार्य विजयसिंग सिसोदिया, डॉ. बलदेवसिंग गिरासे ,रुपसिंग गिरासे साहित्यीक प्रा. डॉ संजीव गिरासेंसह अन्य मान्यवर उपस्थित होते. गेल्या सात महिन्यापूर्वी संजय राजपुत यांनी राजपुत समाज संघटनाशिवाय तालुक्यात राबवलेले उपक्रम बघता चित्तोडगढ जोहरस्मृती संस्थान राजस्थानतर्फे महाराणी पदमिनी पुरुस्काराने सन्मानित केले होते. यशश्री पुरस्काराबद्दल सातपुडा कारखाना चेअरमन दिपक पाटील ,समन्वयक मकरंद पाटील ,सातपुडा शिक्षण सस्थेचे विभागीय सचिव प्रा. संजय जाधव , वर्षा जाधव, प्राचार्य डॉ. सुभाष महाले दुध संघाचे चेअरमन रविंद्र रावल समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोरसिंग गिरासे ,डॉ. सुवर्णसिंग गिरासे ,नगरसेवक रविंद्र जमादार , प्रतापसिंह गिरासे , श्याम राजपुत शहादा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे कौतुक करण्यात आले.