राजभवनातील 18 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह: राज्यपाल क्वारंटाईन

0

मुंबई: जगभर थैमान घालणारा कोरोना आता महाराष्ट्राच्या राजभवनात पोहोचला आहे. राजभवनातील एकदमच 18 कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहे. त्यामुळे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वतः ला क्वारंटाईन केले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाबधितांची संख्या झपाट्याने वाढत आहे. काल एकाच दिवशी महाराष्ट्रात 18 हजारापेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहे. महाराष्ट्रातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठीराज्यातील काही शहरात जिल्ह्यात पुन्हा लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. मात्र तरीही संख्येत मोठी वाढ होत आहे.