होळथांथे । येथील राजमृद्रा प्रतिष्ठाण व आई जोगेश्वरी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था तर्फे 31 मे रोजी जागतीक तंबाखु विरोधी दिनानिमित्त तंबाखु विरोधात जनजागृती करण्यात आली. यावेळी पान टपरी परिसरात तंबाखुचे दुष्परिणाम संदर्भ पत्रक वाटून तंबाखु व गुटखा विरोधात जनजागृती करण्यात आली. गुटख्याचे दुष्परिणाम घ्यावयाची काळजी तसेच अठरावर्षाखालील मुलास तंबाखु विक्री करणे कायद्याने गुन्हा आहे. या संदर्भ माहिती असलेले पत्रक राजमृद्रा प्रतिष्ठाण व जोगेश्वरी संस्थेतर्फे जनहितार्थ प्रकाशित करण्यात आले.
प्रकाशन करताना यांची होती उपस्थिती
होळनांथे आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश पवार, आरोग्य सहाय्यक महाले, राजमृद्रा प्रतिष्ठाणचे योगेश पाटील, आरोग्य सहायिका पुष्पा आर. आढाव, थाळनेर ग्रामिण रुग्णालयाचे आरएच डॉ. मगरे, यांच्या हस्ते पत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सांगवीचे वैद्यकीय अधिकारी डॉ. निंबाळकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. मंगेश निकम तालुका आरोग्य पर्यवेक्षक डॉ. चव्हाण, आ. सहाय्यक पी.व्ही. पवार, के.डी.पिंजारी, दुर्गा चौधरी, मनिषा पावरा, प्रयोगशाळा अधिकारी डॉ. तडवी, औषध नियंत्रण अधिकारी राजेंद्र पावरा, मनोहर रामोशी आदींची उपस्थिती होते.