राजर्षी शाहु महाराज जयंती उत्साहात साजरी

0

चाळीसगांव । आरक्षणाचे जनक राजर्षी शाहु महाराज यांची 143 वी जयंती रयत सेनेच्या वतीने शहरातील पवारवाडी स्थित विठ्ठल रुख्मिणी मंदीर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. छत्रपती शाहु महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन विनायक मांडोळे व रयत सेना संस्थापक गणेश पवार यांच्या हस्ते करण्यात आले. गणेश पवार यांनी शाहु महाराज यांनी महाराजानी तळागाळातील जनतेसाठी आरक्षणाचे दरवाजे खुले केले त्याच बरोबर सर्व समाजाला न्याय देण्याची भूमिका त्यांची होती म्हणून त्यांना आरक्षणाचे जनक संबोधले जाते असल्याचे सांगत उपस्थिताना मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
रयतसेना जिल्हाध्यक्ष संजय कापसे, जिल्हा उपाध्यक्ष सूर्यकांत कदम, अनिल कोल्हे, सप्निल गायकवाड, देवेद्र पाटील, पंकज पाटील, मयुर चौधरी, शुभम देशमुख, मुकुंद पवार, अनिल पाटील, विलास मराठे, प्रशांत असबे, दिलीप पवार, अमोल पाटील, मगेश देठे, निबा पाटील, छोटु निबाळकर , आबा देवरे, राजेंद्र चव्हाण, मगेश पवार आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.