राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालयाला पारितोषिक प्रदान

0

महाराष्ट्र शासनाकडून उर्जासंवर्धनाबद्दल

पिंपरी :- गुणवत्तापूर्ण अभियांत्रिकी शिक्षण देताना सातत्याने संशोधन व नवनिर्मितीवर भर देणारे राजर्षी शाहू अभियांत्रिकी महाविद्यालय हे उर्जा बचत व संवर्धनाचे मॉडेल ठरले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विकास अभिकरण योजने अंतर्गत या महाविद्यालयाला पारितोषिक मिळाले आहे. वेस्टन हॉटेलमध्ये झालेल्या कार्यक्रमात ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, अन्न व नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते हा पुरस्कार महाविद्यालयाचे संकुल संचालक प्रा. सुधीर भिलारे, प्रा. डॉ. बी. डी. जाधव, प्रा. डॉ. जे. ए. होले व प्रा. एस. एल. चव्हाण यांनी स्वीकारला. त्यावेळी महाऊर्जाचे अभय बाकरे, महाव्यवस्थापक डॉ. विपीन शर्मा आदी उपस्थित होते.

उर्जाबचत म्हणजेच उर्जानिर्मिती
उर्जाबचत म्हणजेच उर्जानिर्मिती असते. भविष्यात अपारंपरिक उर्जेला पर्याय नाही. अन्न, वस्त्र, निवारा व वीज या चार बाबी मानवासाठी महत्वाच्या आहेत, असे मत ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र उर्जा विकास अभिकरण योजने अंतर्गत उर्जा बचत व संवर्धन यासाठी हा उपक्रम सुरु आहे. संस्थेचे सचिव डॉ. तानाजीराव सावंत यांनी सुरु केलेल्या शिवजलक्रांती अभियानातून प्रेरणा घेऊन संस्थेने सोलर ऊर्जेचे पॅनल बसवून ऊर्जा निर्मिती केली आहे. त्याचप्रमाणे ओल्या कचर्‍यापासूनसुद्धा बायोगॅस इंधन निर्मितीचा प्रयोगही केला आहे. उपक्रमांचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. के. जैन व ताथवडे संकुलाचे व्यवस्थापक रवी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. या प्रकल्पासाठी संस्थेचे उपप्राचार्य प्रा. ए. एस. देवस्थळी व सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले .