राजश्री शाहू प्रतिष्ठान पथकातर्फे रक्षाबंधन

0

पुणे । गेल्या 15 वर्षांपासून प्रत्येक वर्षी गणेशोत्सवात राजश्री शाहू प्रतिष्ठान ढोल-ताशा पथक वादनातून बाप्पाच्या चरणी आपली सेवा समर्पित करत असते. त्यातीलच एक भाग म्हणजे रक्षाबंधन उत्सव. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून या पथकाची स्थापना झाल्यामुळे रक्षाबंधन कार्यक्रम पथकात मुलांचाच सहभाग असतो. याचा उद्देश म्हणजे पथकातील प्रत्येक मुलगा हा आपला मित्र नसून भाऊ आहे. ह्या नात्याने प्रत्येक वर्षी 100 ते 150 वादक हे एकमेकांना राखी बांधून हा उत्सव साजरा करतात. भावा-भावांमध्ये प्रेमाचे नाते दृढ व्हावे, यासाठी हा आगळा-वेगळा उपक्रम राबविला जातो.