नेरळ । कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज व मॉडर्न स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कर्मवीर मॅराथॉन – दर्जेदार शिक्षणासाठी दौडमध्ये नवी मुंबईतील राजर्षी शाहू महाराज विद्यालयाने बाजी मारली. राजश्री शाहू महाराज विद्यालयाच्या धावपटूंनी विविध सहा गटांमधील ३० पारितोषिकांपैकी तब्बल १६ बक्षिसे मिळवली. १४ वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक वैभव मोरे, द्वितीय क्रमांक रूपेश कोंढाळकर, तृतीय क्रमांक सुशील जपणकार. ४ क्रमांक साइराज पवार तर पाचवा वा क्रमांक,इमाम शेख यांनी मिळवला. या गटातील मुलींमध्ये प्रथम क्रमांक काजल शेख, द्वितीय क्रमांक यादनिका दळवी, तृतीय क्रमांक अंजली नामावर, चतुर्थ क्रमांक मीना कांबळे तर पाचवा क्रमांक प्रीती हलगरे यांनी मिळविला.
१७ वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक रुपेश जाधव रा. फ. नाईक तर द्वितीय क्रमांक.संजय मोरे तृतीय क्रमांक संजय सोनवणे, चतुर्थ क्रमांक सौरव रणावरे व पाचवा क्रमांक आकाश तोर्गे यांनी मिळविला. १७ वर्षाखालील मुलींच्या गटात प्रथम क्रमांक अश्विनी मोरे, द्वितीय क्रमांक कांचन हलगरे, तृतीय क्रमांक शालिनी वाघे ,चतुर्थ क्रमांक गीतांजली नरसाळे तर पाचवा क्रमांक कुलथे प्रतीक्षा हिने मिळविला.
१९ वर्षाखालील मुलांमध्ये प्रथम क्रमांक नानु दिपू, द्वितीय क्रमांक निलेश अरास्कर,तृतीय क्रमांक करण देवरे, चतुर्थ क्रमांक सर्वेश सतीश तर पाचवा क्रमांक मच्छीन्द्र नाईक यांनी मिळविला. ९ वर्षाखालील मुलींमध्ये प्रथम क्रमांक शीतल भोर, द्वितीय क्रमांक स्नेहल शिंदे ,तृतीय क्रमांक रुपाली बडे,४ था क्रमांक श्रद्धा पाताडे तर पाचवा क्रमांक निकीता धुमाळ हिने मिळवला.