राजसत्तेला व्यक्तीच्या विकासाकडेही द्यावे लागते लक्ष -प्रा.ज.जि.पाडवी

0

नाहाटा महाविद्यालयात सामाजिक शास्त्रातील नवे प्रवाहावर व्याख्यान

भुसावळ- धर्म हा सत्तेपेक्षा वेगळा असून राजसत्तेला व्यक्तीच्या विकासाकडे लक्ष द्यावे लागते. राजकीय पक्षांची धडपड सत्ता मिळविण्यासाठी होते, असे मत प्रा.ज.वि.पाडवी यांनी ‘धर्म, सत्ता व राजकारण’ या विषयावर मार्गदर्शन करताना व्यक्त केले. कला, विज्ञान आणि पु.ओ.नाहाटा वाणिज्य महाविद्यालयात सामाजिक शास्त्रे विभागांतर्गत ‘सामाजिक शास्त्रातील नवे प्रवाह’ या विषयावर सप्ताह सुरू असून बुधवारी प्रा.पाडवी यांचे व्याख्यान झाले.

सजग लोकशाहीसाठी मतदानाचा हक्क बजवावा
प्रा.पाडवी म्हणाले की, भारताच्या राज्य घटनेची दुरुस्ती होऊन प्रांत धर्मनिरपेक्ष हा शब्द टाकला गेला. अमेरीकेतील प्रगल्भ लोकशाहीचे उदाहरण त्यांनी उदाहरण देत त्यांनी समाजातील राजकीय पक्षांची वस्तुस्थिती सांगून भारतीय राज्यघटनेत नमूद केलेल्या मूलभूत अधिकारांची आठवण करून दिली. भारतामध्ये लोकशाही यशस्वीपणे सुरू असून त्यांच्या विकासासाठी, यशस्वीतेसाठी आजच्या तरुण वर्गाने सजग होऊन आपले मतदानाचे हक्क बजवावे, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्षीय समारोप करताना उपप्राचार्य डॉ. बी. एच. बर्‍हाटे यांनी भारतीय संविधानाचे महत्व स्पष्ट केले.

यांची होती उपस्थिती
सूत्रसंचालन विद्यार्थी शुभम सपकाळे तर प्रास्ताविक राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.आर.एस.नाडेकर यांनी केले. वक्त्यांचा परीचय विद्यार्थी रोहित कपूर याने तर आभार प्रदर्शन डॉ.डी.एम.टेकाडे यांनी मानले. सामाजिक शास्त्र विभागातील डॉ.ए.डी.गोस्वामी, प्रा.डॉ.पी.ए.अहिरे, प्रा.एस.टी.धूम, प्रा.व्ही.ए.सोळुंके, प्रा.प्रफुल्ल इंगोले तसेच बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते.