राजस्थानी व्यापार्‍याने लावला ग्राहक, खाजगी सावकारांना चुना

0

होळनांथे। येथील भवनी स्टीलचे मालक अर्जुन धनगर (राजस्थान) हा व्यापारी माल बुकींगच्या नावानो अनके ग्राहकांकडून तसेच खाजगी सावकारांकडून लाखो रूपयांची उचल घेऊन महिनाभरांपासून गायब झाला आहे. असे असूनही त्याच्या विरोधात अद्याप कोणत्याही प्रकारचा गुन्हा दाखल नसल्याचे कळते. तीन वर्षांपूर्वी होळनांथे येथे सिमेंट, लोखंड, स्टील, आसारी तसेच घर बांधकामांसाठी लागणारे मटेरीयल विक्रीचे भवानी स्टील या नावाने कार्यालय स्थापून अर्जुन धनगर हा होळनांथे येथे स्थायीक झाला. गावातील इतर व्यापार्‍यांपेक्षा त्याचा भाव कमी असल्याने साहजिकच तो नवीन असूनही अनेेक ग्राहक त्याच्याकडून माल घेणे पसंद करू लागले होते. धनगर हा माल बुकींगच्या नावाने अ‍ॅडव्हान्स पैसे घेत असे. यात त्याने दहा हजार ते एक लाख रूपये अ‍ॅडव्हान्स बुकींगच्या नावाखाली पैसे ग्राहकांकडून उकळले असल्याचे समजते. बुकींगचे पैस घेऊन तो व्यापारी गेल्या महिन्यापासून गायब असल्याने ग्राहकांना घर बांधकाम करण्यास अडचणी येत आहेत. ग्राहकांनी साहित्य बुकींग करतांना बिल घेतले नसल्याने अर्जुन धनगर या व्यापार्‍यांवर अद्याप गुन्हा दाखल नसल्याचे
समजते.

खाजगी सावकारांना गंडवले
या व्यापार्‍याने ग्राहकांच्या बुकींगच्या पैसे व्यतिरिक्त खाजगी सावकारांनाही लाखो रूपयांचा चुना लावला असून अव्वाच्या सव्वा भावाने पैसे दिले असल्याने खाजगी साकरांची तेरी भी चुप, मेरी भी चुप अशी अवस्था झाली आहे. दरम्यान, परप्रांतियांच्या जाळ्यात फसण्याची होळनांथेकरांची ही पहिलीच घटना नसून यापूर्वीही सागर मिस्तरी नावाच्या राजसथानी कारागिराने घर बांधकामाच्या नावाने अनेक ग्राहकांकडून उचल घेऊन तसेच खाजगी सावकारांकडून पैसे घेऊन पसार होण्याची घटना ताजी असूनही अर्जुन धनगर या राजस्थानी होळनांथेकरांना पुन्हा चुना लावला आहे. विशेष म्हणजे आजही दहा ते बारा राजस्थानी व्यापारी असून एकही व्यापारी या भामट्याला ओळखत नसल्याचे सांगतात. याबाबत परप्रांतीय व्यापार्‍यांबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण होत असून त्याचीही चौकशी होणे गरजेचे असल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. सागर मिस्तरी, अर्जून धनगर सारखे परप्रांतीय व्यापारी येतात अन् लुटून जातात अशी अवस्था होळनांथेकरांची झाली असून संबंधीतांचे शॉपअ‍ॅक्ट लायनन्स आहे का? असे विविध प्रश्‍न चर्चीले जात आहेत.