राजस्थानी समाजातर्फे गुणवंतांचा सत्कार

0

भुसावळ। येथील डॉ. उल्हास पाटील इंग्लिश मिडीयम स्कुलचा विद्यार्थी मंथन मोहन भराडे हा दहावीच्या सीबीएसई परिक्षेत 95 टक्के गुण मिळवून विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाला. या यशाबद्दल त्याचे नुकतेच माहेश्‍वरी समाजाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी यांच्या कार्यालयात सत्कार समारंभ करण्यात आला. गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी समाजातर्फे उपक्रम राबविण्यात आला.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती
यावेळी राधेश्याम लाहोटी, राजेश लढ्ढा, संजय लाहोटी, नरेंद्र लढ्ढा, नितीन सुराणा, नगिनचंद कोटेचा, मोहन भराडे, राज भराडे, नकुल अस्वार, निलेश लाहोटी, सिध्दार्थ सुराणा आदी उपस्थित होते.