राजस्थान निवडणूक: कॉंग्रेसकडून उमेदवारांची शेवटची यादी जाहीर

0

जयपूर-देशातील पाच राज्यात विधान सभेच्या निवडणुका होत आहे. राजकीय वातावरण तापले आहे. राजकीय पक्षांनी आपले उमेदवार जाहीर केले आहे. दरम्यान कॉंग्रेसने आज राजस्थानच्या निवडणुकीसाठी शेवटची यादी जाहीर केली. यात १८ उमेदवारांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. १८ उमेदवारांमध्ये लोकतांत्रिक जनता दल आणि राष्ट्रीय लोक दलला २ तर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला १ जागा दिली आहे.

राजस्थानमध्ये भाजपसमोर कॉंग्रेसचे कडवे आव्हान आहे. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये ही प्रमुख लढत रंगली आहे.