राजस्थान विधानसभा निवडणुकीत बसपा उमेदवाराचा मृत्यू

0

जयपूर : राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराने जोर धरला आहे. मात्र या निवडणुकीआधीच अलवर जिल्ह्यातील रामगढचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे. ही घटना आज सकाळी घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, राजस्थान विधानसभा निवडणुकीत राज्यभर सगळीकडे जोरदार प्रचार सुरु आहे. सर्व उमेदवार मतदार संघात फिरून प्रचार करत मतदारांच्या भेटीगाठी घेत आहेत. त्यादरम्यान बसपाच्या उमेदवाराचे निधन झाल्याची घटना घडली आहे. अलवर जिल्ह्यातील रामगडचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे हार्ट अटॅकने निधन झाले आहे.

निवडणुक स्थगित होण्याची शक्यता

बसपाचे उमेदवार लक्ष्मण सिंह यांचे गुरुवार सकाळी निधन झाले. निवडणुक प्रचारा दरम्यान लक्ष्मण सिंह यांचे निधन झाल्यामुळे आता या विधनासभा मतदारसंघातील निवडणुक स्थगित होऊ शकते. जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी यासंदर्भात रिपोर्ट मागवला आहे. हा रिपोर्ट निवडणुक आयोगाला पाठवण्यात येणार आहे.