राजस्थान सत्तासंघर्ष अखेर संपले; कॉंग्रेसने जिकला ‘विश्वास’

0

जयपूर: कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी बंड केल्याने राजस्थानमधील कॉंग्रेस सरकार अडचणीत आले होते. मात्र आता सचिन पायलट परत कॉंग्रेसमध्ये दाखल झाले आहेत. सचिन पायलट परतल्याने सरकारवरील धोका टळला आहे. मात्र तरीही मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी पुढील सहा महिन्यांसाठी निश्चित राहण्याच्या दृष्टीने आज शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी विधानसभेत विश्वासदर्शक प्रस्ताव दाखल केला. हा प्रस्ताव कॉंग्रेसने जिंकला आहे. त्यामुळे कॉंग्रेस सरकारवरील धोका टळला आहे सोबतच राजस्थानमधील राजकीय सत्तासंघर्ष देखील संपले आहे. आज विधानसभेचे सत्र बोलविण्यात आले होते.

विधानसभेतील बहुमत प्रस्ताव जिंकल्यानंतर कॉंग्रेस आमदारांनी जल्लोष केला. कॉंग्रेसमध्ये दुमत असल्याचा फायदा घेत भाजपने देखील अविश्वास प्रस्ताव दाखल करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र कॉंग्रेसने विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे.

विश्वास मत जिंकल्यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्वीट केले आहे. यात त्यांनी राजस्थानच्या जनतेने निवडून दिलेले सरकार कायम असून जनतेचा विश्वास कायम आहे. जनतेने निवडून दिलेले सरकार पडण्याचे अनेक प्रयत्न झाले पण ते अयशस्वी ठरले असे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी म्हटले आहे.

विश्वास मताच्या प्रस्तावावर बोलतांना माजी उपमुख्यमंत्री सचिन गेहलोत यांनी ‘मी आता उपमुख्यमंत्री पदावर नसल्याने माझी सभागृहात बसण्याची जागा बदलण्यात आली आहे. एखादा सैनिक ज्याप्रमाणे सीमेवर देशाचे रक्षण करतो, त्याप्रमाणे मी या नवीन जागेवरून कॉंग्रेसचे रक्षण करील असे सांगितले.