राजीनामा मागणाऱ्यांना सुधीर मुनगंटीवार यांनी दिले सडेतोड उत्तर

0

पिंपरी चिंचवड: अवनी वाघीण नरभक्षक झाली होती. अवनीने १३ जणांना ठार केले होते. त्यामुळे न्यायालयाच्या निर्देशानुसारच तिचा एन्काऊंटर करण्यात आला आहे. यामध्ये नियमांचे कोणतेही उल्लंघन झाले नाही. ‘सत्य परेशान होता है, पराजित नही’ असे सांगत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विरोधकांना सडेतोड उत्तर दिले.

पिंपरीतील एच.ए.मैदनावर असोसिएशन ऑफ इन्व्हेस्टमेंट होटिकल्चर असोसिएशनतर्फे आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय फुलांच्या प्रदर्शनाचे उद्घाघटन गुरुवारी हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

माझा राजीनामा केंद्रीयमंत्री मनेका गांधी नव्हे भाजप अध्यक्ष अमित शहा मागू शकतात. इतर कोणालाही राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, असा टोलाही मुनगंटीवार यांनी लगावला. सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सकारात्मक आहे. मागासवर्गीय आयोगाच्या अहवालानुसार सरकार आरक्षण देणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.