दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदिनी आपल्या भाषणात भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधीं यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले होते, राजीव गांधी हे भ्रष्टाचारात नंबर १ असल्याचा आरोप केला होता. या आरोपाला काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी प्रत्युत्तर दिलं असून, भारतातील गुप्तहेर खात्याने वारंवार माहिती देऊन, विनंती करूनही सुरक्षा न देणारं व्ही. पी. सिंग सरकार राजीव गांधींच्या हत्येला जबाबदार असल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे.
व्ही.पी.सिंग सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता, अशी आठवणही पटेल यांनी करून दिली आहे. राजीव गांधी यांना त्यांचे सहकारी नंबर १ क्लीन म्हणायचे पण ते भ्रष्टाचारा बाबत १ नंबर होते. कालच्या मोदी यांच्या वक्तव्या मुळेभाजप-काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या आहेत. राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वढेरा यांनी या विधानाचा मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला असून, येणाऱ्या काळात हे वाक्युद्ध अजून रंगनार असल्याचे संकेत मिळत आहे.
कॉंग्रेस पक्षाने मोदी यांच्या विधानावर टीका केली असून या वाक्याचा निषेध केला आहे. आता या मध्ये कॉंग्रेस चे जेष्ठ नेते अहमद पटेल यांनी सहभाग घेतला असून प्रत्युत्तर म्हणून त्यांनी राजीव गांधीच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित केला आहे. राजीव गांधी पंतप्रधान असताना आयएनएस युध्दनौकेचा वापर गांधी कुटुंबाने आपल्या खाजगी कामासाठी केला असल्याचा आरोप मोदी यांनी केला होता.