पुणे । राष्ट्रीय वरिष्ठ तिरंदाजी स्पर्धेतील ऑलिम्पिक फेरीमध्ये राजीव एम. आणि मल्लेश्वरी देवी यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरीत सुवर्णपदक पटकावले, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत लंगंबा मेइतेइ, मिलन मेइतेइ, हेरोबा सिंग व इसाक सिनाते लालचुऑइलोवा या मणिपूरच्या संघाने सुवर्णपदक जिंकले. महिलांच्या सांघिक स्पर्धेत प्रीती यादव, आकांक्षा वाघेला, झाला कृतिकाबा व अमिता राथ्वा या गुजरातच्या संघाने सुवर्णपदकावर आपले नाव कोरले. येथील आर्मी स्पोर्टस इन्स्टिट्यूट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत पुरुषांच्या ऑलिम्पिक फेरीमध्ये मेघालयच्या राजीव एम. याने सुवर्ण, रेश्मा बहादूर बुधाठोकीने रौप्य, तर विष्णू बहादूर थापाने कांस्यपदक पटकावले.
महिलांच्या ऑलिम्पिक फेरीमध्ये मणिपूरच्या मल्लेश्वरी देवीने सुवर्ण, राजप्रियारीने रौप्य तर तुतुमोनी बोरोने कांस्यपदक पटकावले, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत लंगम्बा मेइतेइ, मिलन मेइतेइ, हेरोबा सिंग व इसाक सिनाते लालचुऑइलोवा या मणिपूरच्या संघाने सुवर्ण, राजेश कुमार, ब्रिजेश कुमार, अभिषेक कुमार सिंग व सिद्धार्थ देशवाल या मध्य प्रदेशच्या संघाने रौप्य, तर राजीव एम, अविनाश राभा, कुमार अले व लारीलांग लिंगडोह या मेघालयच्या संघाने कांस्यपदक पटकावले, तर महिलांच्या सांघिक फेरीमध्ये प्रीती यादव, आकांक्षा वाघेला, झाला कृतिकाबा व अमिता राथ्वा या गुजरातच्या संघाने सुवर्ण, मलेश्वरी देवी, देबीया देवी, सोनिया देवी व मालेमंगांबी चानु या मणिपूरच्या संघाने रौप्य तर तुतुमोनी बोरो, पल्लवी दास, बिनामोनी राभा व शांती टोपो या आसामच्या संघाने कांस्यपदक पटकावले.