राजुरा सरपंचपदी सुशिला कांडेलकर

0

मुक्ताईनगर। राजुरा सरपंच, उपसरपंचपदासाठी नुकतीच निवड प्रक्रिया होवून सरपंचपदी भाजपाच्या सुशिला रमेश कांडेलकर तर उपसरपंचपदी रघुनाथ कांडेलकर यांची बिनविरोध निवड झाली. ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या निवड प्रक्रियेत अभ्यासी अधिकारी म्हणून तिर्थणकर यांनी काम पाहिले. तलाठी के.एच. चौधरी, ग्रामसेवक मनोज घोडके, सुधा भोलाणकर यांनी सहकार्य केले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पुरणमल चौधरी, बाजार समिती सभापती निवृत्ती पाटील उपस्थित होते.

विधानसभा क्षेत्रप्रमुख रमेश ढोले, तालुका सरचिटणीस डॉ. बी.सी. महाजन, पोलीस पाटील वृषाली भोलाणकर, रणजित गोयनका, जिल्हा परिषद सदस्य निलेश पाटील, शिवा पाटील, रसाल पवार, पुंडलिक सरक, दिलीप भोंबे, गणेश बोंडे, डॉ. गजानन खिरळकर, पुंडलिक कपले, बंडू बोरसे, शिवराम पाटील, अनिल कांडेलकर, शिवशंकर भोलाणकर, ग्रामपंचायत सदस्य गणेश कांडेलकर, नर्मदा कांडेलकर यांच्यासह ग्रामस्थांनी नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचे स्वागत केले. सुत्रसंचालन अ‍ॅड. वसंत भोलाणकर यांनी तर आभार अ‍ॅड. अरुण कांडेलकर यांनी मानले.