पिंपरी-चिंचवड : शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल विश्व नायक क्रांती ग्रामविकास संस्था (बीड-मुंबई) यांच्यातर्फे राष्ट्रीय स्तरावर देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘क्रांती प्रेरणा पुरस्कार 2017’ मातोश्री फाउंडेशनचे अध्यक्ष राजू श्यामराव पोखर्णीकर यांचा प्रदान करण्यात आला. 9 ऑगस्ट, क्रांतीदिनी नवी दिल्लीतील कॉन्स्टिट्यूशन क्लब येथे झालेल्या एका समारंभात मानवी संसाधन आणि विकास मंत्रालयाच्या संसदीय समितीचे अध्यक्ष सत्यनारायण जटिया यांच्या हस्ते पोखर्णीकर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
यांची होती उपस्थिती
या समारंभास परराष्ट्रीय मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे, केंद्रीय सामाजिक अधिकारीता आणि न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, प्रा. सुरेश गायकवाड, बोदले महाराज, प्रकाश मानवलकर, गवई आदी मान्यवर उपस्थित होते. राजू पोखर्णीकर हे खडकी, रेंजहिल्स येथील केंद्रीय विद्यालयात प्राथमिक शिक्षक आहेत. प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याने त्यांचे मित्र परिवाराकडून अभिनंदन होत आहे.