उरण : राजु मुंबईकर यांचे कार्य आदर्शवत असून समाजाला एक नवी दिशा देणारे आहेत, असे प्रतिपादन कर्नाला स्पोर्ट उपाध्यक्ष तथा श्री साई देवस्थान वहालचे अध्यक्ष रविशेठ पाटील यांनी रायगड भूषण राजु मुंबईकर यांच्या वाढदिवसा निमित्त आयोजित चिरनेर येथील आदिवासी आश्रम शाळेतील मुलांसाठी कपडे व शालेय वस्तू वाटप कार्यक्रम प्रसंगी केले. सर्वजण आपला वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात मात्र राजु मुंबईकर आपला वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत आदिवासी बांधवांसोबत साजरा करतात. राजु मुबंईकर यांचा आदर्श समाजाने घ्यावा असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
आदिवासी मुलांसमवेत वाढदिवस साजरा
यावेळी आदिवासी मुलांसमवेत वाढदिवस साजरा करुन मान्यवरांच्या हस्ते दत्तक घेतलेल्या मुलांना कपडे व शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले. यावेळी उद्योजक राजा खारपाटील जिल्हा परिषद सदस्य बाजीराव परदेशी, पार्वती पाटील, मो. का. मढवी, बाळाराम पाटील, शिरीष कडू, साईचरण पाटील, रोटरी क्लब ऑफ सनराईजचे मदन बडगुजर, डॉ. कुलकर्णी. डॉ. दिपक खोत, प्रदिप ठाकरे, वैभव पालकर, विलास ठाकूर केतन मुंबईकर ए. जि. मोरे, एस. डी. मोरे, एस. डी. साळुंखे, एस. के. मढवी, एस. एल. शिंदे, पि. व्हि. बरकडे, एम. सी. डोइफोडे, के. एम. पिचड आदि सह विध्यार्थी उपस्थित होते.