चाळीसगाव –तालुक्याचे भाजपचे ज्येष्ठ नेते व जिल्हा बँकेचे संचालक दिवंगत वाडीलाल राठोड यांचे निधनानंतर रिक्त जागेवर आज सर्वानुमते त्यांचे चिरंजीव व जिल्हा परिषदेचे माजी समाजकल्याण सभापती राजेंद्र राठोड यांची जिल्हा बँक संचालकपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे माजी आमदार राजीव देशमुख हे त्यांना सूचक झाले आहेत. यावेळी जिल्हयाचे नेते एकनाथराव खडसे यांच्या हस्ते त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
यावेळी माजी आमदार राजीव देशमुख, शेषराव पाटील, किसनरावजी जोर्वेकर चेअरमन खादी ग्रामोद्योग सोसायटी सरपंच टाकली प्र.चा.,राजेंद्र अण्णा चौधरी गटनेता न.पा. चाळीसगाव, कैलास सूर्यवंशी सदस्य रा.कृषी अनुसंधान परिषद, नगरसेवक भगवान राजपूत, नगरसेवक दीपक पाटील, नाना पवार, सुरेश स्वार, भाऊसाहेब जगताप, डॉ.रामेशजी निकम, अरुण पाटील, योगेश खंडेलवाल, विवेक चौधरी, राजेंद्र मांडे, संजय चौधरी, राजेंद्र पगार, शमनोहर सूर्यवंशी, मोरसिंग जाधव, रुपेश पाटील, गौरव चौधरी, सचीन स्वार, सचीन आव्हाड, गोरख साळुंखे, रमेश तोळा राठोड, विश्राम राठोड, धनराज राठोड, योगेश जाधव, विष्णु चव्हाण, मिलिंद राठोड आदी उपस्थित होते.