धुळे। शिरपूर तालुक्यातील करवंद येथील राजेंद्र सोनवणे खून खटल्याचा 3 वर्षांनंतर धुळे न्यायालयाने आज निकाल दिला असून 2 आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर अन्य एकाची निर्दोष मुक्तता करन्यात अली आहे. दि 3 मार्च 2014 रोजी करवंद येथील फोटोग्राफर राजेंद्र सोनवणे यांना क्रूझर गाडीत घालून आरोपी सुभाष रामचंद्र पाटील, दीपक लोटन माळी या दोघांना मदत करणारा अनिल साहेबराव पाटील या तीघंनी मिळून राजेंद्र याचा गळा आवळून खून करून मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गलागत करमाळी फाट्याजवळ एका ज्वारीच्या शेतात रॉकेल टाकून जाळून टाकण्याचा प्रयत्न केला होता .
मयताच्या पत्नीशी होते आरोपीचे अनैतिक संबंध
दरम्यान मयताच्या भाऊ दत्तात्रय सोनवणे यांनी संशयितांविरुद्ध नरडाणा पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तीन वर्षांपासून राजेंद्र सोनवणे खून खटला धुळे सत्र न्यायालयात सुरू होता. शुक्रवारी न्या.बावसकर यांच्या न्यायालयाने आरोपी सुभाष पाटील व दीपक माळी यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली असून संशयित अनिल पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. सरकार पक्षातर्फे अड.मल्हारराव देशपांडे यांनी तर आरोपी तर्फे अॅड. पी पी एंडाईत,तवर सुभाष,दीपक देवेन यांनी काम पाहिले.मयत राजेंद्र सोनवणे यांच्या भावाने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सुभाष पाटील यास राजेंद्र सोनवणे यांनी आपल्याकडे ड्राइव्हर म्हणून कामाला ठेवले होते. राजेंद्र सोनवणे यांनी सुभाष पाटील यास कामावरून काढून टाकले होते. तरी देखील सुभाष पाटील याचे राजेंद्रच्या घरी येणे जाणे सुरू होते. दरम्यान राजेंद्र यांनी सुभाष याला समज देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु राजेंद्रला आपल्या रस्त्यातला काटा समजून काढून टाकण्याचा प्रयत्न करत सुभाष याने दीपक माळी याच्या मदतीने खून केला असल्याची माहिती तक्रारीत दिली होती.