जालना : जालन्यात काँग्रेस आमदार कैलास गोरंटयाल यांनी एका कार्यक्रमात आरोग्यमंत्री राजेश टोपेंचं जाहीर कौतुक केलं. मात्र त्यांचा सत्कार करण्यास त्यांनी जाहीरपणे नकार दिला.
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या पार्शवभूमीवर जालन्यात 100 खाटाच्या मेडिकॅब कोविड हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे. त्याचबरोबर नेत्रचिकित्सल्याच्या अत्याधुनिक फेको मशिनसह नुतनीकरण केलेल्या इमारतीचे आरोग्यमंत्री राजेश टोपेंच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. यावेळी आमदार कैलास गोरंटयाल यांनी टोपेंवर जाहीर कौतुकाचा वर्षाव केला. मात्र त्यांचा सत्कार करण्यास जाहीररीत्या नकार दिला. सर्व प्रक्रिया आणि निकष पात्र करून देखील जालन्यात मेडिकल कॉलेजला मंजुरी मिळत नाही मात्र परभणीचा प्रस्ताव नसताना त्यांना परवानगी मिळते याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. शायराना अंदाजमध्ये आमदार गोरंटयाल यांनी मेडिकल कॉलेजसाठी पाठपुरावा करण्याची मागणी करत टोपेंवर मार्मिक ताशेरे ओढले.