यावल : तालुक्यातील राजोरा गावाने जिल्ह्यात शंभर टक्के लसीकरण करण्यात प्रथम क्रमांक पटकावला असून खासदार रक्षा खडसे यांनी याबद्दल ग्रामपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कोविड योद्धे असलेले कर्मचारी, आरोग्यदुत, आशा स्वयंसेविकांचा सत्कार केला.
राजोरा गावाचा आदर्श अन्य गावांनीही घ्यावा
खासदार रक्षा खडसे म्हणाल्या की, सुरूवातीला कोविडची लस आली होती तेव्हा नागरीकांमध्ये बर्याच अफवा पसरविण्यात आल्या होत्या, त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक लसीकरण करण्यात घाबरत होते परंतु राजोरा गावात लसीकरणासाठी पुढे येऊन हे अश्यक्यप्राय काम पूर्णत्वास आले, संपूर्ण कोविड योद्धे, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते यांच्यासह ग्रा.प. पदाधिकारी यांनी खूप मेहनत घेतली. जिल्ह्यातील इतर गावातील ग्रामस्थांनी सुद्धा राजोरा येथील ग्रामस्थांचा आदर्श घेऊन न घाबरता लसीकरण करावे, असे आवाहन खासदारांनी यावेळी केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी भाजपा यावल पंचायत समिती सभापती पल्लवी चौधरी, यावल तालुकाध्यक्ष उमेश फेगडे, शहराध्यक्ष निलेश गडे, जि.प.सदस्य सविता भालेराव, सरपंच पुष्पा पाटील, उपसरपंच दिनेश पाटील, सरपंच संघटना जिल्हाध्यक्ष पुरूजीत चौधरी, पोलीस पाटील मुक्ताबाई गोसावी, यावल भाजपा तालुका सरचिटणीस उज्जैनसिंग राजपूत, भाजयुमो तालुकाध्यक्ष सागर कोळी, भाजयुमो तालुका सरचिटणीस व्यंकटेश बारी, भाजपा शाखाध्यक्ष कल्पेश पाटील, मधुकर नारखेडे, उल्हास पाटील, हिरामण पाटील, युवराज पाटील यांच्यासह डॉ. झाकीर हुसेन, डॉ हेमंत बर्हाटे, ग्रामसेवक प्रवीण चौधरी, आरोग्य सेवक अल्ताफ देशपांडे व समस्त ग्रा.पं.सदस्य, गावकरी व कार्यकर्ते उपस्थित होते.